घरमनोरंजनगोड गाणी स्वीट केकरी

गोड गाणी स्वीट केकरी

Subscribe

मंगेशकर कुटुंबीयांचे जागतिक पातळीवर नाव आहे. त्यांचा फक्त सुरेल आवाजाच रसिकांपर्यंत पोहोचलेला नाही तर निर्मिती, संगीत दिग्दर्शन यातही या कुटुंबीयांनी अनमोल कार्य केलेले आहे. लता मंगेशकर यांनी संगीत दिग्दर्शन केलेच. पण, त्याबरोबर समाजहितासाठी अनेक उपक्रम राबविलेले आहेत. वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने उभारलेले हॉस्पिटल ही त्याचीच पावती आहे. हृदयनाथ मंगेशकर यांचे चिरंजीव आदिनाथ मंगेशकर यांनी अल्बमच्या युगात अनेक गायकांना प्राधान्य देऊन अनेक कॅसेट्स्ची निर्मिती केलेली आहे. आता या कुटुंबीयांनी आणखीन एक पाऊल पुढे टाकलेले आहे. त्याची सुरवात त्यांनी पुण्यापासून केलेली आहे. गोड गाणी हा त्यांच्या कुटुंबाच्या जिव्हाळ्याचा भाग आहे तसाच आता त्यांचा छोटेखानी ‘स्वीट केकरी’ या उद्योगही ग्रहकांपर्यंत पोहोचणार आहे. माधवी जोशी यांच्या सहकार्याने ‘मिसेस बीज केकरी’ हे केक शॉप त्यांनी उघडलेले आहे.

मंगेशकर कुटुंबीयांना महाराष्ट्रातील ज्या दोनचार शहरांचे अप्रूप वाटलेले आहे त्यात जन्मभूमी म्हणून गोवा हा त्यांना आपलासा वाटलेला आहे. वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्यासाठी मुंबई ही कर्मभूमी राहिलेली आहे. पुढे संपूर्ण मंगेशकर कुटुंबीयांचे हे शहर म्हणजे जिव्हाळ्याचे ठिकाण झाले. एखादा उद्योग किंवा सामाजिक कार्य करायचे झाले तर पुणे शहराला त्यांनी प्राधान्य दिलेले आहे. नुकतेच या शॉपचे उद्घाटन झाल्याने पुणेकरांच्या आयुष्यात गोड गाण्यांबरोबर मंगेशकर कुटुंबीयांची स्वीट केकरीही खवय्यांच्या पसंतीला उतरणार आहे. पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर या सोहळ्याला हजर होते. भारती मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, कृष्णा मंगेशकर, बैजनाथ मंगेशकर आणि माधवी जोशी यांचे या कार्यक्रमाला येणे उपस्थितांसाठी आनंदाचा क्षण होता. प्रख्यात शेफ विष्णु मनोहर यांच्या हस्ते या शॉपचे उद्घाटन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -