घरमनोरंजन'बंदीशाळा'मध्ये मुक्ता बर्वेचा डॅशिंग लूक

‘बंदीशाळा’मध्ये मुक्ता बर्वेचा डॅशिंग लूक

Subscribe

मुक्ता 'बंदिशाळा' चित्रपटात दिसणार धडाकेबाज पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत.

अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या नुकताच येऊन गेलेल्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या चित्रपटानंतर मुक्ताचा कोणता नवा चित्रपट येणार? याची तिच्या चाहत्यांमध्ये चर्चा दिसत होती. मुक्ता आता कोणत्या नवीन प्रोजेक्टमध्ये काम करते आहे? हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक होते. मात्र, आता चाहत्यांची उत्सुकता संपली आहे. मुक्ता बर्वेचा ‘बंदिशाळा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘बंदिशाळा’ या चित्रपटामधून मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मुक्ताने ‘बंदिशाळा’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. या चित्रपटात ती एका धडाकेबाज पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘बंदिशाळा’ या  चित्रपटाचे शीर्षक व मुक्ताचा एकंदर लूक पाहिल्यानंतर हा चित्रपट कारागृहावर बेतलेला असेल असे दिसत आहे.

याआधी मुक्ताने ‘गणवेश’ या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याचीच भूमिका साकारली होती.

 

View this post on Instagram

 

Motion poster release ‘बंदिशाळा’ 10th May. #bandishala #10thmay #muktabarve #beyondmuktabarve #beyondmukta

A post shared by Mukta Barve (@muktabarve) on

- Advertisement -

सोशल मीडियावर मोशन पोस्टरला पसंती

८ मार्च महिला दिनाचे औचित्य साधत मुक्ताने आपल्या चाहत्यांसाठी या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले.  या मोशन पोस्टर  व्हिडीओमध्ये मुक्ता तडफदार पोलिस अधिकाऱ्याच्या वेशात दिसत आहे. तिच्या या डॅशिंग लूकमध्ये ती गुंडांशी लढा देताना दिसत आहे. सोशल मीडियावर या पोस्टरला लोकांकडून तुफान प्रसिद्धी मिळत आहे. या ‘बंदिशाळा’ हा  चित्रपट १० मे रोजी प्रदर्शित होणार आहे त्यामुळे मुक्ताचा डॅशिंग लूक आणि अनोखा अंदाज पहाण्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट बघावी लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -