लोककलावंत छगन चौगुले यांचे मुंबईत निधन!

'खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली काल बाई सुपारी फुटली' या गाण्याने छगन चौगुले यांना विशेष ओळख मिळवून दिली.

Mumbai
Chaggan chogule

प्रसिध्द लोककलावंत छगन चौगुले यांचं गुरूवारी निधन झालं. त्यांना मुंबईतील सेव्हन हिल्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतांनाच छगन चौगुले यांनी अखेरचा  श्वास घेतला.

‘खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली काल बाई सुपारी फुटली’ या गाण्याने छगन चौगुले यांना विशेष ओळख मिळवून दिली. त्यांचं हो गाणं प्रचंड गाजलं. या गाण्याबरोबरच ‘कथा चांगुणाची’, ‘कथा श्रावण बाळाची’, ‘आईचे काळीज’, ‘अंबाबाई कथा : कथा तुळजापुरची भवानी’, ‘कथा देवतारी बाळूमामा’ यासारखे अनेक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाच्या सीडीज तर विशेष गाजल्या.

हाडाचा कलावंत छगन चौगुले

छगन चौगुले यांनी लोककलेचे विशेष प्रशिक्षण घेतले नव्हते. तरीही त्यांच्यात कला सादर करण्याचं विशेष कौशल्य होते. ते जागरण गोंधळी होते. त्यामुळे त्यांची सुरुवात हे जागरण गोंधळाच्या कार्यक्रमातून झाली.


हे ही वाचा – WhatsApp…डिलीट केलेले मेसेज वाचायचे आहेत? तर मग हे करा…