घरताज्या घडामोडीमुंबई पोलिसांना सुशांत सिंह राजपूतच्या इमारतीचे सीसीटीव्ही फूटेज मिळाले

मुंबई पोलिसांना सुशांत सिंह राजपूतच्या इमारतीचे सीसीटीव्ही फूटेज मिळाले

Subscribe

याबाबत झोन ९चे डिसीपी अभिषेक त्रिमुखे यांनी माहिती दिली आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी गेल्या कित्येक दिवसांपासून त्याच्या जवळच्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. काल बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचीही या प्रकरणी चौकशी झाली. दरम्यान आता सुशांत ज्या इमारतीत राहत होता त्या इमारतीचे सीसीटीव्ही फूटेज मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. सुशांतच्या घरात कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता. सध्या फॉरेन्सिक अहवालाची वाट पाहत असल्याचे, झोन ९चे डिसीपी अभिषेक त्रिमुखे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

- Advertisement -

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रविवारी दुपारी मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतचे असे अचानक निघून जाणे हे सर्वांच्याच मनाला चटका लावून गेले. त्याच्या आत्महत्येनंतर संपूर्ण बॉलिवूड हादरले. तसेच यानंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा वाद सुरू झाला. येत्या २४ जुलै रोजी सुशांतचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट डिस्नी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. कालच ‘दिल बेचारा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. सुशांतच्या या अखेरचा ठरलेल्या चित्रपटाने स्टार किड्सच्या चित्रपट ट्रेलर्स पसंतीला मागे टाकले आहे.

‘दिल बेचारा’ चित्रपटात अभिनेत्री संजना संघी हिच्यासोबत सुशांत सिंह राजपूत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाला लेजंट ए. आर. रेहमान यांचे संगीत लाभले आहे. मुकेश छाबरा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आतापर्यंत ‘दिल बेचरा’ या चित्रपटाच्या ट्रेलरला २.९ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले असून ६० लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सुशांतच्या ‘दिल बेचारा’ चित्रपट ट्रेलरने मोडले ‘हे’ रेकॉर्ड


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -