घरताज्या घडामोडीसंगीतकार वाजिद खानची आईही कोरोनाबाधित; रुग्णालयात घेत होती मुलाची काळजी

संगीतकार वाजिद खानची आईही कोरोनाबाधित; रुग्णालयात घेत होती मुलाची काळजी

Subscribe

बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद - वाजिद त्यांची आई रजीना खान यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद – वाजिदमधील वाजिद खान यांचा दोन दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. दरम्यान, काळजी घेण्यासाठी त्यांची आई सतत त्यांच्यासोबत रुग्णालयात होती. मात्र, आता त्यांची आई रजीना खान यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कुटुंबातील व्यक्तींनी मंगळवारी यासंदर्भात बोलताना सांगितलं की, ‘रजीना खान यांना चेंबूर येथील सुराणा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.’

‘संगीतकार जोडी साजिद – वाजिद यांच्या आईला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट येईपर्यंत त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात आले होते’, अशी माहिती त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीने दिली आहे.

- Advertisement -

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; साजिद-वाजिद यांची आई त्यांच्य़ा मुलाच्या देखभालीकरता रुग्णालयात होत्या. त्याच दरम्यान, त्या अनेक कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्या होत्या आणि त्याच दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे बोले जात आहे.

संगीतकार जोडी साजिद-वाजिद

वाजिद यांना अनेक व्याधींनी ग्रासले होते. त्यांना किडनीचा विकार होता. याकरता काही दिवसांपूर्वी त्यांनी किडनी ट्रान्सप्लांटही केले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यात इंफेक्शन झाल्याचे समजले. वाजिद यांना अखेरचे चार दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. कालांतराने त्यांची प्रकृती अजून खालावत गेली आणि त्यांचा त्याचा मृत्यू झाला.

- Advertisement -

सलमान खान यांच्या बहुतांश चित्रपटांना संगीत

बॉलीवूडमध्ये १९९८ साली आलेल्या प्यार किया तो डरना क्या चित्रपटातून त्यांनी संगीतकार जोडी म्हणून पदार्पण केले होते. त्यांनी अनेक हिट गाणी हिंदी सिनेसृष्टीत दिली आहे. सलमान खानच्या अनेक चित्रपटांना या जोडीने संगीतबद्ध केले आहे. गर्व, तेरे नाम, तुमको ना भूल पायेंगे, पार्टनर यातील गाणी लोकप्रिय आहेत. त्यांनी सारेगमप २०१२ आणि सारेगमप सुपरस्टार या रिअॅलिटी शोमध्ये परिक्षकाची भूमिका साकारली होती.


हेही वाचा – ‘रामायण’ला टक्कर देण्यासाठी ‘या’ मालिकेची २३ वर्षांनी पुन्हा होणार एन्ट्री!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -