घरमनोरंजनसलील घेऊन येतोय 'वेडिंगचा शिनेमा'

सलील घेऊन येतोय ‘वेडिंगचा शिनेमा’

Subscribe

संगीतकार सलील कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेला 'वेडिंगचा शिनेमा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच त्यांनी 'सुर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर' या कार्यक्रमात याबाबत खुलासा केला.

संगीतकार सलील कुलकर्णी आणि गीतकार संदीप खरे ही जोडी प्रेक्षकांमध्ये खूप आवडती आहे. आपल्या गोड गाण्याने प्रेक्षकांना भुरळ घालणारा सलील लवकरच वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. गेली २० वर्ष रसिक श्रोत्यांची सेवा केल्यानंतर सलील आता दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकत आहेत. नुकताच त्यांनी ‘सुर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर’ या कार्यक्रमात याबाबत खुलासा केला.

हेही वाचा – यामी गौतम हिने असा साजरा केला बर्थ डे

- Advertisement -

‘वेडिंगचा शिनेमा’ची गोष्ट हलकी-फुलकी

लवकरच सलील कुलकर्णी यांचा ‘वेडिंगचा शिनेमा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाविषयी सांगताना सलील म्हणाले की, प्रत्येकवेळी एखादा व्हिलनच चित्रपटात असावा तरच तो चित्रपट प्रेक्षकांना आवडेल असं नाहीये, तर एखादी हलकीफुलकी स्टोरी घेऊन सगळे एकत्र दाखवले तरी तो चित्रपट सुंदर होऊ शकतो. ‘वेडिंगचा शिनेमा’ची गोष्टही अशीच हलकी फुलकी आहे, जी सगळ्यांना आवडेल. वेडिंगच्या आधी आणि नंतर घरात होणारी धम्माल मस्ती म्हणजे ‘वेडिंगचा शिनेमा’. ही धम्माल सगळ्यांनाच आवडेल, प्रेक्षक ही कथा आपल्याशी जोडून घेतील. अशा पध्दतीने ही कथा लिहीली आहे. आजपर्यंत केलेल्या गाण्यांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं, आता एका नवीन वाटेवर प्रवास सुरू करत आहे. आताही प्रेक्षकही चांगला प्रतिसाद देतील याची खात्री आहे, असे सलील कुलकर्णी म्हणाले.

हेही वाचा – ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’; चित्रपटाचा टीजर रिलीज

- Advertisement -

सलील यांनी ‘ही’ पुस्तके लिहिले आहेत

सुंदर गाण्यांव्यतिरीक्त ‘लपवलेल्या काचा’ आणि ‘शहाण्या माणसांची फॅक्टरी’ ही दोन सलील कुलकर्णी यांची पुस्तक वाचकांच्या भेटीला आली. आणि ही दोनही पुस्तकांच्या आजही अनेक अवृत्त्या विकल्या जात आहेत. त्याचप्रमाणे सलील यांचा ‘मधली सुट्टी’ हा कार्यक्रमही प्रेक्षकांना खूप आवडला. संगीतकार, लेखक, निवेदक आणि आता दिग्दर्शन म्हणून सलील कुलकर्णी प्रेक्षकांसमोर येत आहेत.


हेही वाचा – गायक मोहम्मद अजीज यांचे निधन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -