घरमनोरंजन‘आसूड’ चित्रपटाचा म्युझिक लाँच

‘आसूड’ चित्रपटाचा म्युझिक लाँच

Subscribe

आगामी मराठी चित्रपट ‘आसूड’चा म्युझिक आणि ट्रेलर लाँच सोहळा नुकताच मु्ंबईतल्या प्रभादेवी भागामध्ये पार पडला. या सोहळ्याला चित्रपटाच्या स्टारकास्टसोबतच अनेक दिग्गजांचा सहभाग होता.

अनेक सामाजिक विषय मराठी चित्रपटांतून अतिशय कौशल्याने हाताळले जातात. शेतकऱ्यांच्या समस्या हा अतिशय संवेदनशील विषय आहे. त्या संदर्भात बेजबाबदार समाजव्यवस्थेला खडसाऊन प्रश्न विचारत, त्यांचाविरुद्ध लढा देणाऱ्या एका तडफदार युवकाची कथा ‘आसूड’ या आगामी चित्रपटात दाखवण्यात आली आहे. नुकताच या चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा उत्साहात संपन्न झाला. विशेष म्हणजे हिंदी सिनेसृष्टीतले सुप्रसिद्ध संगीतकार ‘अनु मलिक’ यांनी ‘आसूड’ च्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी संगीत दिले आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत राज्याचे गृहराज्यमंत्री मा.डॉ.रणजीत पाटील यांनी चित्रपटाचे संगीत अनावरण केले. चित्रपटाच्या ट्रेलरची आणि गीतांची झलक यावेळी उपस्थितांना दाखवण्यात आली. येत्या ८ फेब्रुवारीला ‘आसूड’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अनु मलिक यांनी आनंद व्यक्त केला

चित्रपटाला शुभेच्छा देत, वास्तवादी विषय प्रभावीपणे मांडल्याबद्दल मा.डॉ.रणजित पाटील यांनी निर्माते डॉ.दीपक मोरे व दिग्दर्शक निलेश रावसाहेब जळमकर यांचे अभिनंदन केले. ‘आसूड’ च्या निमित्ताने मराठी चित्रपटाला संगीत देणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब होती’ असं सांगत अनु मलिक यांनी मराठीतल्या पदार्पणाबद्दल आनंद व्यक्त केला. सर्वसामान्यांच्या जीवनाला भिडणारे प्रश्न मांडत वास्तवाची जाणीव करून देणे आज गरजेचे असून ‘आसूड’च्या माध्यमातून हा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन दिग्दर्शक निलेश रावसाहेब जळमकर यांनी केले.

- Advertisement -

जेष्ठ कलाकारही चित्रपटात

विक्रम गोखले, प्रदीप वेलणकर, माधव अभ्यंकर, अनंत जोग, दीपक शिर्के, उपेंद्र दाते, संदेश जाधव, कमलेश सावंतयांच्यासोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा ठसा उमटवणारे राणा जंगबहादूर, अवतार गील हे नामवंत कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्यासोबतच अमित्रीयान पाटील आणि रश्मी राजपूत ही नवी आघाडीची जोडी या चित्रपटात झळकणार आहेत. कथेच्या अनुषंगाने येणाऱ्या तीन गीतांना सोनू निगम, आदर्श शिंदे, दिव्या कुमार आणि अनमोल मलिक यांनी स्वरबद्ध केले आहे. शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न तथा क्लिष्ट सरकारी यंत्रणा व राजकीय पाठबळ असलेले उद्योग जनसामान्यांचा कसा उपयोग करून घेतात याचे चित्रण ‘आसूड’ या चित्रपटाच्या माध्यमातून पहायला मिळणार आहे.

- Advertisement -

गोविंद प्रोडक्शन प्रस्तुत ‘आसूड’ चित्रपटाची निर्मिती डॉ.दीपक मोरे यांची असून सहनिर्मिती विजय जाधव यांची आहे. लेखन व दिग्दर्शन निलेश रावसाहेब जळमकर तर सहदिग्दर्शन अमोल ताले यांचे आहे. कथा–पटकथा आणि संवाद निलेश रावसाहेब जळमकर व अमोल ताले यांचे आहेत. छायांकन अरुण प्रसाद यांनी केले असून संकलन सचिन कानाडे यांचे आहे. ८ फेब्रुवारीला ‘आसूड’ प्रदर्शित होणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -