‘स्वामी त्रैलोक्याचा’ संगीत ध्वनिफीतीचे प्रकाशन

भक्तिगीतांच्या माध्यमातून स्वामी भक्तांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘स्वामी त्रैलोक्याचा’ ही नवीन संगीत ध्वनिफीत स्वामींच्या भक्तांसाठी उपलब्ध झाली असून या ध्वनिफीतीचा प्रकाशन अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला.

Mumbai
Swami Trailokyacha
संगीत ध्वनिफीतीचे प्रकाशन

‘अशक्यही शक्य करतील स्वामी’ हे वाक्य नुसतं उच्चारलं तरी जगण्याला नवी ऊर्जा मिळते. श्री स्वामी समर्थांचा अवतारच मानवी जीवनाच्या कल्याणासाठी संकटमुक्तीसाठी झालेला आहे. स्वामी समर्थांचा महिमा, त्यांचे कार्य, त्यांची कीर्ती भक्तिगीतांच्या माध्यमातून त्यांच्या भक्तांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘स्वामी त्रैलोक्याचा’ ही नवीन संगीत ध्वनिफीत स्वामींच्या भक्तांसाठी उपलब्ध झाली असून या ध्वनिफीतीचा प्रकाशन अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला.

लोकांसाठी भक्तीगीते 

या ध्वनिफीतीची निर्मिती वैजयंती परब यांनी केली आहे. त्यांच्या ‘भावानुभव’ व ‘भावांजली’ या काव्यसंग्रहावर आधारलेली ही भक्तीगीते स्वामी भक्तांपर्यंत पोहचावीत यासाठी या ध्वनिफीतीची निर्मिती केल्याचे सांगत ही भक्तीगीते स्वामी भक्तांच्या पसंतीस उतरतील असा विश्वास वैजयंती परब यांनी याप्रसंगी व्यक्त केला. या ध्वनिफीतीच्या निमित्ताने स्वामींची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे समाधान संगीतकार स्वरूप नंदू होनप यांनी व्यक्त केले. या ध्वनिफीतीसाठी गाताना वेगळा आनंदानुभव मिळाला, असं सांगत ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांनी या ध्वनिफीतीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.

ही असणार भक्तीगीते

वैजयंती परब लिखित ‘स्वामी त्रैलोक्याचा’ या ध्वनिफीतीमधील गाण्यांना अनेक नामवंत गायकांनी स्वरसाज चढवला आहे. पद्मश्री अनुप जलोटा, पद्मश्री अनुराधा पौडवाल, अजित कडकडे, रविंद्र साठे, वैशाली सामंत आणि आर्या आंबेकर या प्रसिद्ध गायकांचा यात समावेश आहे. संगीतकार स्वरूप नंदू होनप यांनी यातील गीते संगीतबद्ध केली आहेत. ‘माता पिता बंधू सखा’,’अंतरंग रंगले माझे’, ‘स्वामीमय झाले मन’,‘स्वामी के दरबार में’, ‘तेरी क्रिपा होगी’, ‘तुझे रूप चित्ती’, ‘स्वामी पाके तेरे दरसन’,‘जय देव जय देव अक्कलकोट स्वामी’ अशा हिंदी–मराठी गाण्यांचा नजराणा या ध्वनिफीतीत असणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here