घरमनोरंजनमी जास्त दिवस जगणार नाही - इरफान खान

मी जास्त दिवस जगणार नाही – इरफान खान

Subscribe

किमो थेअरपीचे चार सेशन पूर्ण झाल्यानंतर इमरानने दिली प्रतिक्रिया ...

बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेता ‘इरफान खान’ दुर्धर आजाराने ग्रासला असून त्यावर लंडन येथे उपचार सुरु आहे. भारताबाहेर उपचार सुरु असले तरी इरफानच्या भारतीय फॅन्सचे लक्ष त्याच्या उपचारावर आहे. इरफान लवकरच बरा व्हावा अशी फॅन्सकडून प्रार्थना करण्यात येत असतानाच इमरान मात्र उपचारादरम्यान आपली इच्छाशक्ती गमावत असल्याचे चित्र आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत इमराने ही माहिती दिली. आतापर्यंत केलेल्या किमो सेशनचे रिपोर्ट सकारात्मक आला आहे. सेशन पूर्ण झाल्यानंतर पून्हा एकदा कॅन्सर स्कॅन केला जाणार आहे. दरम्यान मागील काही महिन्यांपासून इरफानच्या जिवनात मोठा बदल झाला आहे. इरफानकडे सध्याही मागील वर्षातील काही चित्रपट आहेत, यापैकी ‘कारवाँ’ चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे.

इरफानने आपल्या आजाराबद्दल सांगितले, “मी जिवनाला जवळून बघीतले आहे. जिवनात तुमच्यासमोर अनेक आव्हाने येतात मात्र आता मला असे वाटत आहे की ‘ही’ वेळ सर्वात कठिन आहे. सध्या मी एका वेगळ्याच मनस्थितीत आहे. मला माझ्या आजाराबाबत ऐकून आर्श्चयाचा धक्का लागला होता. मात्र मी स्वतःला संभाळले आणि आता माझ्यात अधिक शक्ती आली आहे. या आजारातून बाहेर येणार की नाही? असे लोकांनी प्रश्नचिन्ह उचलला आहे. मात्र माझी प्रकृती माझ्या हातात नाही. आयुष्याने मला खूप काही दिलयं. उपचारादरम्यान माझा जिवनाला बघण्याचा दृष्टीकोण बदलला. मी ३० वर्ष मेडिटेशन करुनही मला हा अनूभव मिळणार नाही.”

- Advertisement -

इरफान ने म्हंटल आहे की, “उपचारादरम्यान आयुष्यात कोणत्याही गोष्टी प्लान करत नाही कारण आविष्यात काहीच गोष्टी प्लान केल्या सारख्या होत नाहीत. कीमो थेरपीचे ४ सेशन पूर्ण झाले आहेत. कॅन्सरवरील पूर्ण उपचारासाठी मला ६ सेशन पूर्ण करणे गरजेचे आहे. यानंतर बघू मला आयुष्य कुठे घेऊन जाते आहे. जगात कोणाच्याच जिवनाची शाश्वती नाही.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -