घरमनोरंजननागराज मंजूळे यांचे 'फास्टेस्ट फिंगर फर्स्ट' मतदान

नागराज मंजूळे यांचे ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ मतदान

Subscribe

नागराज मंजूळे यांनी सहपरीवार मतदानाचा हक्क बजावला. 'फास्टेस्ट फिंगर फर्स्ट' असं म्हणत त्यांनी मतदानाचे फोटो सोशलमिडीयावर शेअर केले आहेत.

आज लोकसभा निवडणूकीचे तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. आज मतदानासाठी लोकांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी केली होती. यात खास आकर्षण ठरले ते मराठी कलाकार. यावर्षी मराठी कलाकारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं. यात सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजूळे यांचाही सहभाग आहे. नागराज मंजूळे यांनी सहपरीवार मतदानाचा हक्क बजावला. ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ असं म्हणत त्यांनी मतदानाचे फोटो सोशलमिडीयावर शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

Fastest finger first…

A post shared by Nagraj Popatrao Manjule (@nagraj_manjule) on

आपल्या जवळील मतदान केंद्रावर ‘फास्ट’ पोहोचून आपल्या आवडीच्या मतदारासाठीचे बटन दाबा आणि आपल्या बोटावर अभिमानाची शाई उमटवा, असेच तो आपल्याला सुचवतोय. असं म्हणतात की “उत्तर शोधलं की जगणं बदलतं”. जसं की ‘कोण होणार करोडपती’ मध्ये प्रत्यक्ष जाऊन जेव्हा तुम्ही ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ खेळाल तेव्हा त्या एका प्रश्नाचे उत्तर तुमचं जगणं बदलून टाकेल, त्याचप्रमाणे आजचे तुमचे मत म्हणजे तुमच्या नागरी समस्यांवर तुमचं जगणं बदलणारं उत्तर ठरू शकतं. असं म्हणत नागराजने मतदान करण्याचं अवाहन केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nagraj Popatrao Manjule (@nagraj_manjule) on

- Advertisement -

 लवकरच नागराज मंजूळे सोनी मराठीवर ‘कोन बनेगा करोडपती’ हा शो होस्ट करताना दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

कोण होणार करोडपती..!? चांगभलं !! #sonymarathi

A post shared by Nagraj Popatrao Manjule (@nagraj_manjule) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -