घरताज्या घडामोडीमहाराजांवर चित्रपट; शिवजयंतीच्या निमित्ताने नागराज मंजुळेंची मोठी घोषणा

महाराजांवर चित्रपट; शिवजयंतीच्या निमित्ताने नागराज मंजुळेंची मोठी घोषणा

Subscribe

अभिनेता रितेश देशमुख या चित्रपटाची निर्मिती करणार असून या चित्रपटाला अजय-अतूल यांनी संगीत दिले आहे.

मराठी सिने सृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे लवकरच शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘शिवत्रयी’ म्हणजेच तीन चित्रपट घेऊन येणार आहेत. याची माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. या सिनेमाचा टिझर ट्विट करत या चित्रपटाची घोषणा त्यांनी केली आहे. हा चित्रपट तीन भागात प्रदर्शित होणार आहे. नागराज मंजुळे हे सामाजिक वास्तव मांडणारे चित्रपट आतापर्यंत करत आलेले आहेत. फँड्री, सैराट, नाळ मधून त्यांची कलात्मक सर्जनशीलता दिसून आलेली आहे. आता शिवाजी महाराजांच्या चित्रपटातून देखील ते कोणते नवे पैलू मांडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

रितेश देशमुखचाही सहभाग

अभिनेता रितेश देशमुख या चित्रपटाची निर्मिती करणार असून या चित्रपटाला अजय-अतूल यांनी संगीत दिले आहे. हा चित्रपट तीन भागात प्रदर्शित होणार आहे. २०२१ मध्ये हा चित्रपट प्रक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवाजी, राजा शिवाजी, छत्रपती शिवाजी अशी या चित्रपटांची नावे असणार आहेत.

- Advertisement -

‘एखाद्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभं राहणं म्हणजे हेच असावं कदाचित,’ असं म्हणत नागराज यांनी चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. शिवजयंतीनिमित्त या चित्रपटाची घोषणा करताना मला फार आनंद होत आहे असे म्हणत त्यांनी प्रेक्षकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -