घरमनोरंजनतनुश्रीच्या आरोपांवर नाना पाटेकरांचं उत्तर

तनुश्रीच्या आरोपांवर नाना पाटेकरांचं उत्तर

Subscribe

अभिनेता नाना पाटेकर यांनी अखेर तनुश्री दत्ताच्या आरोपांना उत्तर दिले आहे. तनुश्रीने केलेले आरोप बिनबुडाचे असून त्यावर आपण कायदेशीर अॅक्शन घेऊ, असेही त्यांनी सूचकपणे म्हटले आहे.

बॉलीवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तब्बल दहा वर्षांपूर्वी झालेल्या घटनेचा धक्कादायकक खुलासा तनुश्रीने मीडियासमोर केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या आरोपांवर अखेर नाना पाटेकर यांनी मौन सोडले. टाइम्स नाऊला दिलेल्या टेलीफोनिक प्रतिक्रीयेत नाना पाटेकर यांनी तनुश्रीने केलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. दहा वर्षांपूर्वी आलेला हॉर्न ओके प्लीज या चित्रपटातील एक गाण्याच्या शूटींग दरम्यान नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तणूक केल्याचा खळबळजनक आरोप तिने केला होता. तसेच त्यावेळी मनसेने आपल्याला धमकावल्याचेही तनुश्रीने नमूद केले.

- Advertisement -

काय म्हणाले नाना पाटेकर

आता कोणी काय करणार कोणी काय बोलायच असतं. मला कस कळणार (ती) असं का बोलतेय. सेक्शुअर हरॅस्मेंटमेंट म्हणजे काय… आम्ही सेटवर असतो. समोर २०० माणसं बसली आहेत. मग तिथे आपण काय करणार. मी याला लिगली (कायदेशीर) अॅक्शन काय घ्यायची ते घेईन. बघुया…. तुमच्याशी (मीडियाशी) बोलणं पण चुकीच असंत. (तनुश्रीने) कोणी काय बोलायच हे आपण कस ठरवणार. मी कधी कुठली गोष्ट आयुष्यात…. (सेटवर गैरप्रकार) तेव्हा झालं असत तर समोर आल असतं ना…. कोणी काहीही म्हणावं…. मला आयुष्यात जे करायचय ते मी करणार.

काय होता नेमका आरोप

मॉडेल, अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप कर, ‘या अभिनेत्यामुळे आपण बॉलीवूडला रामराम ठोकला होता,’ असे खळबळजनक वक्तव्य केले होते. २००८ साली तनुश्री दत्ता हिने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला होता. यासंबंधी तिने पोलीस ठाण्यात तक्रारही केली होती. त्यानंतर पासूनच तनुश्रीच्या फिल्मी करिअरला उतरती कळा लागली, असे म्हटले जाते. ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटातील एका आयटम साँगसाठी तनुश्रीची निवड करण्यात आली होती. त्यावेळी तिने असे म्हटले होते की, नाना पाटेकर यांनी तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. तसेच नानासोबत इंटिमेट सीन करण्यास आपण नकार दिला होता. त्यामुळे तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -