घरमनोरंजननटसम्राट पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर

नटसम्राट पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर

Subscribe

२७ नोव्हेंबरपासून नटसम्राट सिनेमा सिनेमागृहात झळकणार

कोरोनामुळे ठप्प झालेले थिएटर आता प्रेक्षकांसाठी खुली करण्यात आली आहेत. सिनेमा पुन्हा एकदा थिएटरमध्ये पहायला मिळणार आहे. मराठी सिनेमात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा सिनेमा म्हणजे नटसम्राट. नटसम्राट हा सिनेमा पुन्हा एकदा सिनेमागृहात पहायला मिळणार आहे. २७ नोव्हेंबरपासून नटसम्राट सिनेमा सिनेमागृहात झळकणार आहे.

काही कलाकृती या कधीही विसरता येत नाहीत. त्या कलाकृतींचा कितीही आस्वाद घेतला तरी मनोरंजनाची भूक शमत नाही. अशीच एक कलाकृती म्हणजे नटसम्राट. नटसम्राटची ही मेजवानी प्रेक्षकांना पुन्हा एकदा सिनेमागृहात जाऊन पाहता येणार आहे. कोरोनाच्या काळात गेली काही महिने सिनेमागृह बंद होती. अनलॉनंतर आता पुन्हा एकदा थिएटरच्या बाहेर सिनेमांचे पोस्टर पहायला मिळणार आहेत.

- Advertisement -

कुठे, कधी, किती वाजता?

शेक्सपियरच्या गाजलेल्या शोकांतिकापासून प्रेरित होऊन वि.वा शिरवाडकर यांनी हे नाटक रंगभूमीवर आणले. सत्तरच्या दशकात ह्या नाटकांने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. त्यानंतर दिग्दर्शक,अभिनेता महेश मांजेकर यांनी नटसम्राट हा सिनेमा प्रेक्षकांसाठी आणला. अभिनेते नाना पाटेकर यांनी साकारलेली आप्पा बेलवलकर ह्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. कुणी घर देत का घर? असं म्हणत अभिनेते नाना पाटेकर यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. मराठी रूपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवून नटसम्राट हा सिनेमा पु्न्हा एकदा २७ नोव्हेंबर पासून मोठ्या पडद्यावर सिनेमागृहात पहायला मिळणार आहे.


हेही वाचा – करण जोहरने मागितली भांडारकरांची माफी, म्हणाला मी तुमचे नुकसान नाही करणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -