हिंदू अंजली नवाजुद्दिनसाठी झाली आलिया सिद्दिकी!

हे दोघं आता जरी वेगळे होणार असले तरी नवाजुद्दीन आणि आलियाची लव्ह स्टोरी खूपच रंजक आहे.

Mumbai

आपल्या वाढदिवसापेक्षाही घटस्फोटाच्या बातमीमुळे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या काही दिवसांपून चर्चेत आहे. त्याची पत्नी आलिया सिद्दीकी हीने नवाजुद्दीनकडे घटस्फोटाची मागणी केली आहे. तशी कायदेशीर नोटीस तीने पाठवली आहे. या पुढे तीला लग्न करण्याची इच्छा नाही, ती लग्न झाल्यापासूनच खूश नव्हती अशी विधानं तीने प्रसारमाध्यमांमध्ये केली आहेत. एक मुलाखतीत आलियानेह नवाजुद्दीनपासून विभक्त होण्याबरोबरच आपल्या मुलांचाही हक्क मागितला आहे. हे दोघं आता जरी वेगळे होणार असले तरी नवाजुद्दीन आणि आलियाची लव्ह स्टोरी खूपच रंजक आहे.

आलिया बरीच वर्षे नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत रहात होती अनेक वर्ष एकत्र राहिल्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता  त्यांच्या लग्नाला १० वर्षे पुर्ण झाली आहेत. आलिया सिद्दीकीचे खरे नाव अंजली आहे. आलिया एका हिंदू ब्राम्हण कुटुंबातील आहे. नवाजने लग्नानंतर तीचे नाव आलिया सिद्दीकी ठेवले. आता घटस्फोटाची नोटीस पाठवल्यानंतर तीने पुन्हा आपले नाव अंजली ठेवण्यास सांगितले आहे. पण आलियाने या आधीच सार्वजनिक व्यासपीठावर कबूल केले आहे की नवाजने तिला कधीही धर्माबद्दल काहीही सांगितले नाही किंवा आपला धर्म त्यांच्यावर लादला नाही.

आलिया आणि नवाजुद्दीन यांची लव्ह स्टोरी एका खोलीतून सुरू झाली आणि दोघे १५ वर्षे एकत्र राहिले. नवाझुद्दीन सिद्दीकीने मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले होते की, लग्नापूर्वी अंजलीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते आणि अंजली नेहमी रागावलेली असायची आणि कधी कधी चिडून तिच्या मैत्रिणीकडे गेली व बराच काळ परत यायचीच नाही.

आलिया आणि नवाज दोघेही एकत्र होते, पण काही कारणास्तव त्यांचे ब्रेकअप झाले. यानंतर नवाजच्या आईने शीबाशी लग्न लावण्याचा निर्णय घेतला. पण हे लग्न फार काळ टिकले नाही आणि घटस्फोट झाला. नवाझने स्वत: सांगितले की त्यांचे लग्न शीबाचा भावामुळे तुटले. शीबापासून घटस्फोट घेतल्यानंतर नवाज आणि आलिया पुन्हा एकत्र आले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर अंजलीने आपले नाव बदलून आलिया केले. आता त्यांना दोन मुलेही आहेत.

एकदा नवाजुद्दीन सिद्दीकीवरसुद्धा आपल्या पत्नीची हेरगिरी करण्याचा आरोप लावण्यात आला होता.  त्यानंतर आलियाने स्वत: एक फेसबुक पोस्ट करत सर्वांचे तोंड बंद केले. आलियाने फेसबुकवर लिहिले की, ‘एका छोट्या घरातून सुरु झालेली आमची प्रेमकहाणी सुरू झाली. आम्ही अनेक चढ-उतार बघितले. अखेर आमचे लग्न झाले. नवाजनेही आपल्या कारकीर्दीतील अनेक चांगली कामं केली. आमची दोन मुलं शोरा आणि यानी यांच्या जन्मामुळे ज्या गोष्टीची कमतरता भासत होती ती देखील पूर्ण झाले. मला नवाजबद्दल नेहमी जी आवडते ती म्हणजे त्याचे विचार. तो कायम समोरच्याला स्पेस देतो. आणि त्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे आपल्या दोघांचा धर्म.

५ रूपयाचा ब्रेड

स्वत: नवाज एकदा म्हणाला होता की, ‘मी खूप आनंदी आहे. आम्ही एकत्र राहून १४ वर्षे झाली आहेत. तर आमच्या लग्नाला ९ वर्ष झाली आहेत. आलिया आणि माझ्यात खूप चांगलं ट्युनिंग आहे. आम्ही एकत्र सर्वात वाईट वेळ घालवला आहे. एक वेळ असा होता जेव्हा मी त्याच्यापासून दूर होतो. माझ्याशी बोलायला, माझा आवाज ऐकण्यासाठी तिच्याकडे एक रुपयाही नव्हता. मी माझ्या मित्राकडून ५ रुपये उधार घेऊन आलियाला ब्रेक फास्ट म्हणून ब्रेड दिला होता.


हे ही वाचा – घरातील ‘या’ व्यक्तीमुळे जान्हवी कपूर, वडील आणि बहिणीसह क्वारंटाईन!