घरमनोरंजनमला अजून सावधान राहण्याची गरज - नवाजुद्दीन सिद्दीकी

मला अजून सावधान राहण्याची गरज – नवाजुद्दीन सिद्दीकी

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री नवाजुद्दीन सिद्दीकीला फॅनने ओढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर फॅन्समध्ये जातांना सावध राहण्याची गरज असल्याचे नवाजुद्दीनने म्हटलं आहे.

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने ओळख निर्माण करणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या फॅन्सबद्दल एक मोठं वक्तव्य केले आहे. फॅन्समध्ये जाताना मला अजून सावध राहण्याची गरज असल्याचे त्याने सांगितले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी नुकताच सेक्रेड गेम्स सीजनमध्ये झळकला होता. नवाजने चित्रपटामध्ये केलेल्या भूमिकाही गाजल्या होत्या. नवाजुद्दीन सध्या कानपूरमध्ये आपल्या आगामी चित्रपटाचे शुटिंग करतो आहे. या चित्रपटात तो एका पोलीस अधिकाऱ्याती भूमिका साकारणार आहे. नवाजद्दीनने गॅग्स ऑफ वासेपूर, मंटो, किक, बजरंगी भाई जान, बदलापूर अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये भुमिका केली आहे. “रात अकेली है” या चित्रपटाचे शुटिंगमध्ये सध्या नवाजुद्दीन व्यस्त आहे. ठाकरे चित्रपटात नवाजने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भुमिका साकारली होती.

काय आहे कारण

नवाजला भेटण्यासाठी फॅन्सची नेहेमीच गर्दी असते. नवाजसोबत सेल्फी काढण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. मात्र अशाच एका अतीउत्साही फॅन्सने सेल्फीसाठी नवाजसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. सेल्फी काढण्यासाठी त्याने नवाजला चक्क ओढून आपल्या कडे खेचले. त्याच्या या कृत्या नंतर नवाजच्या बॉडिगार्डने त्याला मागे करत नवाजला गाडीत बसवले. कानपूर येथे हा प्रकार घडला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायर झाला होता.

 

View this post on Instagram

 

Crazy selfie fan #nawazudinsiddiqui #kanpur

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -