घरमनोरंजनसेल्फीसाठी नावजुद्दीनला फॅनने ओढले

सेल्फीसाठी नावजुद्दीनला फॅनने ओढले

Subscribe

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत सेल्फी काढण्यासाठी त्याचे फॅन्स नेहेमी उत्साहात असतात. यामुळे एका अतीउत्साही फॅनने त्याला चक्क खेचले.

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या गाजलेल्या चित्रपटामुळे नेहेमी चर्चेत असतो. मागील काही वर्षांमध्ये नवाजुद्दीनचा चांगलाच फॅन फॉलोईंग निर्माण झाला आहे. बॉलिवूड चित्रपटातील आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे नवाजला प्रेक्षकांनी चांगलला प्रतिसाद दिला आहे. नवाजला भेटण्यासाठी फॅन्सची नेहेमीच गर्दी असते. नवाज बरोबर सेल्फी काढण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. मात्र अशाच एका अतीउत्साही फॅन्सने सेल्फीसाठी नवाजसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सेल्फी काढण्यासाठी त्याने नवाजला चक्क ओढून आपल्या कडे खेचले. त्याच्या या कृत्या नंतर नवाजच्या बॉडिगार्डने त्याला मागे करत नवाजला गाडीत बसवले. कानपूर येथे हा प्रकार घडला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायर झाला आहे.

 

View this post on Instagram

 

Crazy selfie fan #nawazudinsiddiqui #kanpur

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त  

नवाजुद्दीन सध्या कानपूरमध्ये आपल्या आगामी चित्रपटाचे शुटिंग करतो आहे. या चित्रपटात तो एका पोलीस अधिकाऱ्याती भूमिका साकारणार आहे. नवाजद्दीनने गॅग्स ऑफ वासेपूर, मंटो, किक, बजरंगी भाई जान, बदलापूर अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये भुमिका केली आहे. “रात अकेली है” या चित्रपटाचे शुटिंगमध्ये सध्या नवाजुद्दीन व्यस्त आहे. ठाकरे चित्रपटात नवाजने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भुमिका साकारली होती.

 

View this post on Instagram

 

Thank You for all your Love & Support for #ThackerayTheFilm and Wishing all of you A Very Happy Republic Day.

A post shared by Nawazuddin Siddiqui (@nawazuddin._siddiqui) on

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -