‘तो मला लहानपणी चुकीच्या ठिकाणी स्पर्श करायचा’, नवाजुद्दीनच्या पुतणीने केला आरोप!

नवाजुद्दीनच्या पुतणीनेच हे आरोप केले असून तिने दिल्लीतल्या जामिया पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

Mumbai
Nawazuddin Siddiqui
नवाजुद्दीन सिद्दीकी

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी विविध कारणांमुळे चर्चेत आहे. पत्नी आलियाने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीपासून घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्या नंतर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीच्या भावावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. नवाजुद्दीनच्या पुतणीनेच हे आरोप केले असून तिने दिल्लीतल्या जामिया पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

नवाजुद्दीनच्या पुतणीने वृत्तपत्रांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मी नऊ वर्षांची असताना माझ्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. याविषयी माझ्या काकांविरोधात मी तक्रार दाखल केली आहे. मी दोन वर्षांचे असताना माझ्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. माझ्या सावत्र आईने माझा खूप छळ केला. मी लहान असताना मला समजलं नाही, पण आता मला कळतंय की तो स्पर्श चुकीचा होता. माझं लैंगिक शोषण करण्यात आलं.  या बद्दल काका नवाजुद्दीन सांगितलं असता, नवाजुद्दीन म्हणाल्या की, आपला भाऊ यासारखे कधीही करू शकत नाही. नेहमीच नवाजने मला चुकीचे ठरवले. त्यांनी माझ्यावर कधीच विश्वास ठेवला नाही.”

तिने पुढे असेही म्हटले आहे की तिला असे वाटते की नवाजुद्दीन एका वेगळ्या समाजात आहेत जिथे महिलांचा आदर केला जातो आणि तो तिच्यावर विश्वास ठेवेल. तथापि, त्याने तिच्यावर विश्वास ठेवला नाही हे शाशाने उघड केले. ती म्हणाली की जेव्हा मी एफआयआर नोंदविली तेव्हा तिला नवाजुद्दीनचा फोन आला आणि त्याने अप्रत्यक्षपणे तिला आपली तक्रार मागे घ्या व पुढील खटला पुढे न घेण्यास सांगितले.

भाचीने केलेल्या आरोपावर शमास सिद्दीकीने ट्विट करून उत्तर दिलं आहे, तो म्हणाला आहे, “एखादी व्यक्ती कायद्याची दिशाभूल कशी करू शकते आणि त्याच खटल्याबद्दल वेगवेगळी विधाने दाखल करू शकते. प्रत्येकवेळी वेगवेगळे वक्तव्य करण्यात आली आहेत. कारण पहिले दिलेल्या तक्रारीत नवाजुद्दीनचे नाव नव्हते.


हे ही वाचा – धक्कादायक! नवऱ्याने मित्रांना बोलवून बायकोवर केला बलात्कार