ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी रिया चक्रवर्तीला अखेर NCB कडून अटक

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो  (NCB) ने रियाला अटक केली आहे. या आधी रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना एनसीबीनं चौकशीसाठी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती. त्यांना ९ सप्टेंबरपर्यंत एनसीबी कस्टडी सुनावण्यात आली आहे. याचसंदर्भात गेले ३ दिवस रियाची कसून चौकशी सुरू होती. अखेर सबळ पुरावे हाती लागल्यावरच NCB ने रियाला अटक केली आहे.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये जेव्हा ड्रग्सचा अॅंगल समोर आला होता तेव्हा त्याचे धागे रिया चक्रवर्तीशी कुठेतरी जोडलेले आहेत का? असा सवाल उपस्थित केला गेला आणि आता याच प्रकरणात रिया चक्रवर्ती वर अटक होण्याची नामुष्की ओढावली. आधी रियाचा भाऊ शौविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर आणि रिया चक्रवर्ती जवळचा मित्रा सॅम्युअल मिरांडा यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक करून ९ सप्टेंबरपर्यंत एनसीबी कस्टडी देण्यात आली आहे. NCBच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या प्रकरणांमध्ये आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांनुसार यांचा संबंध समोर आला आहे.

ईडीकडून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा तपास केला जात होता. याच तपासादरम्यान रिया आणि शौविकच्या मोबाईलची तपासणी केल्यावर ईडीला ड्रग्स संदर्भातले चॅट सापडले जे डिलीट करण्यात आले होते आणि हे चॅट सापडल्यानंतर या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची एन्ट्री झाली. आता या प्रकरणात रियाला अटक करण्यात आली आहे. लवकरच तीची मेडिकल टेस्ट केली जाणार आहे.