घरमनोरंजननेहा आणि अंगदला शुभेच्छा

नेहा आणि अंगदला शुभेच्छा

Subscribe

बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपिया आणि अभिनेता अंगद बेदी यांना कन्या रत्न झाले. रविवार, १८ नोव्हेंबरला सकाळी खार येथील महिला हॉस्पीटलमध्ये नेहाने मुलीला जन्म दिला. आई आणि बाळ दोघेही स्वस्थ असल्याची माहिती मिळाली आहे. यावर्षी मे महिन्यात दोघांचा विवाह पार पडला. लग्नाच्या काही महिन्यानंतर लगेचच त्यांनी सोशल मीडियावरून नेहा गर्भवती असल्याचे  सांगितले.  सहा महिन्यातच तिने एका मुलीला जन्म दिला.

 

View this post on Instagram

 

Here’s to new beginnings … #3ofUs …. ?? #satnamwaheguruੴ

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia) on

- Advertisement -

बॉलीवूडच्या बऱ्याच सेलेब्सने त्यांनी सोशल मीडियावर नवीन जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. त्यात करण जोहर, इशा गुप्ता, शिल्पा शेट्टी, अभिशेख बच्चन, आयुश शर्मा,सोफी चौधरी आणि काजोलचा समावेश होता.

- Advertisement -

नेहा लग्ना अगोदरच गर्भवती आहे अशी चर्चा सर्वत्र होत होती. तिच्या या अवस्थेमुळे त्यांना लवकर लग्न करण्यास भाग पडले  अशी  ही चर्चा रंगली. सुरूवातीला दोघांनीही नेहा गर्भवती असल्याच्या चर्चेला नकार दिला. मात्र अंगदने ‘नो फिल्टर नेहा’ च्या एका भागात या बातमीला दुजोरा दिला. नेहा प्रेग्नन्ट असल्यामुळे आम्हाला लग्नाची घाई करावी लागली, असं अंगदने स्पष्ट केलं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -