लग्नाच्या ८ महिन्यांनंतर नेहाच्या पतीने केला मोठा खुलासा

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जोडी नेहा धुपिया आणि अंगद बेदी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. लग्नाच्या आठ महिन्यांनंतर नेहाचा पती अंगदने एक मोठा खुलासा केला आहे.

New Delhi
neha dhupia
अभिनेत्री नेहा धुपिया

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जोडी नेहा धुपिया आणि अंगद बेदी हे दाम्पत्य पून्हा एकदा चर्चेत आले आहे. २०१८ मध्ये नेहाने अंगद बरोबर लग्नाचा एकाएकी निर्णय घेतला होता. यानंतर काही महिन्यात नेहाला एक कन्यारत्न झाले. आता नेहा पून्हा एका रियालिटी शो मधून कमबॅक करते आहे. या शोमध्ये नेहा धुपिया बरोबर रॅपर रफ्तार सिंग आणि प्रिंस नरूला जज म्हणून दिसणार आहेत. लग्नानंतर बदललेल्या जीवनासंदर्भात नेहाने नुसताच हिंदूस्तान टाइम्सशी दिलखूलास गप्पा केल्या केल्या आहेत. आपले करियर आणि मातृत्वामध्ये ताळ मेळ बसवणे हे एक मोठ्या जबाबदारीचे काम असल्याचे तिने सांगितले आहे. मी जरी कामात असली तरी माझी मुलगी काय करते याबद्दल मी फोन वरून माहिती घेत असते, अंगदनेही त्याचे काम काही प्रमाणात केले आहे अशी प्रतिक्रिया नेहाने दिली.

 

View this post on Instagram

 

The leaders are back … @mtvroadies 2019 … its all about the #realheroes ? ? @rjdeigg

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia) on

अंगदने केला ‘हा’ खुलासा

नेहाने आपल्या शो दरम्यान ‘टायगर जिंदा है’ मध्ये काम केलेल्या अंगद बेदीला बोलावले होते. अंगदला लग्नासंगदर्भात प्रश्न विचारले असता तो म्हणाला की,”नेहा गर्भवती असल्याची माहिती तिला कोणालाच समजू द्यायची नव्हती. आम्ही एक दुसऱ्यावर प्रेम करत होतो आणि आम्हाला लग्नही करायचे होते. नेहाच्या आई-वडिलांना ज्यावेळी ही गोष्ट सांगायची होती मी खूप नर्व्हस झालो होतो. मात्र आम्हाला काही करून आई-वडिलांना ही गोष्ट सांगायचीच होती. त्यामुळे मला न घाबरता एका मर्दाची जबाबदारी पार पाडायची होती.”

“एका पत्नीच्या नात्याने मला ही गोष्ट लपवणे गरजेचे होते मात्र एका प्रोड्युसरच्या नात्याने मला या बाबत सांगणे भाग पडले. लग्नाचा निर्णय ४८ तासांमध्ये घेतला गेला. मात्र कधी कधी जीवनात चांगल्या गोष्टी लवकरही घडून येतात. आणि या गोष्टींचा मला पश्चाताप नाही. मला लग्न करायला सहा महिने किंवा एका वर्षाचा वेळ दिला असता तरीही मी अंगदशीच लग्न केलं असतं.” – अभिनेत्री नेहा धुपिया

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here