रोडीज फेम नेहा धुपिया झाली क्रिकेटरची सून!

Mumbai
Neha Dhupia and Angad Bedi
नेहा धुपिया आणि अंगद बेदी लग्नाच्या बेडीत

गेले काही दिवस सोनम कपूरच्या लग्नाच्या चर्चा करण्यात सगळेच मग्न असताना अजून एक अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकल्याचे समोर आले आहे. रोडीजफेम नेहा धुपियाने अभिनेता अंगद बेदी याच्याशी लग्नगाठ बांधली आहे.
आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अंगदसोबतचा लग्नातील फोटो पोस्ट करत नेहा धुपियाने ही गोड बातमी दिली आहे. नवी दिल्ली येथे पारंपरिक शीख विवाहपद्धतीनुसार नेहा आणि अंगद यांनी लग्न केले. नेहामागोमाग अंगदनेदेखील सोशल मीडियावर आपल्या लग्नाची माहिती दिली. अचानक असा फोटो समोर आल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला मात्र चाहत्यांनी दोघांनाही भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. दोघांनीही फोटो पोस्ट करत आपल्या मैत्रीचं रुपांतर नव्या नात्यामध्ये झाल्याचे सर्वांना सांगितले.

सध्या नेहा धुपिया रोडीजमध्ये व्यस्त असून ती आता बिशनसिंग बेदी या प्रसिद्ध क्रिकेटपटूची सून झाली आहे. अंगद बेदी हा हिंदी सिनेमामध्ये काम करत असून त्याने नुकत्याच टायगर जिंदा है मध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.