Friday, August 7, 2020
Mumbai
27.5 C
घर मनोरंजन Video : नेहा- आदित्यचं लग्न झालं हो!!! व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Video : नेहा- आदित्यचं लग्न झालं हो!!! व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Mumbai

गेल्या काही दिवसांपासून नेहा कक्कर आणि आदित्य नारायणच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. इंडियन आयडॉलच्या सेटवर या दोघांच्या लग्नाची घोषणा देखील झाली होती की हे दोघं १४ फेब्रुवारीला लग्न करणार आहेत. मात्र या दोघांच्या लग्नाचा एक व्हीडिओ समोर आला आहे. या व्हीडिओत इंडियन आयडॉलच्या सेटवरच या दोघांनी लग्न केल्याचे समजतय.

या व्हीडिओत बघितलं तर या दोघांच्या लग्नाची संपूर्ण तयारी सेटवर करण्यात आली होती. हार, अग्निकुंड, अशी जोरदार तयारी सेटवर करण्यात आली होती. व्हीडिओत हे दोघं एकमेकांना हार घालताना दिसत आहेत. या व्हीडिओत केवळ सेटवरचे प्रेक्षक नाही तर आदित्य आणि नेहाचे आई-बाबाही हाजर होते. या शोमधील जज देखील या लग्नाला हजेरी लावतात.

 

उदित नारायण यांनी केला खुलासा

गेल्या काही दिवसांपासून नेहा कक्कर आणि आदित्य नारायण १४ फ्रेबुवारी रोजी लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या. या चर्चा आदित्य इंडियन आयडल पर्व ११च्या सेटवर नेहासोबत करत असलेल्या मस्तीमुळे सुरु झाल्या होत्या. पण आता उदित नारायण यांनी आदित्यच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे.

उदित नारायण यांना नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये आदित्यच्या लग्नाबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी ‘मी आणि माझी पत्नी आदित्यच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहात आहोत. पण आदित्य इतक्यात लग्नबंधनात अडकणार नाही’ असे ते म्हणाले. पुढे उदित नारायण यांनी नेहा आणि आदित्यच्या लग्नाच्या सर्व अफवा आहेत असे म्हटले. ‘मला असे वाटते की आदित्य आणि नेहाच्या लग्नाच्या अफवा या केवळ इंडियन आयडल शोचा टीआरपी वाढवण्यासाठी पसरवल्या जात आहेत.

View this post on Instagram

Hayeeee #NehAditya #AdityaNarayan #NehaKakkar #Goabeach

A post shared by Neha Aditya (@_nehaaditya_) on

इंडियन आयलच्या सेटवर आदित्य नेहासोबत सतत फ्लर्ट करताना दिसतो. तसेच शोमध्ये नेहाने आदित्यची आई दीपा यांना ‘सासू माँ’ म्हणून आवाज दिला होता. त्यामुळे त्या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते.