घरमनोरंजननेहा कक्करने एक्स बॉयफ्रेंडला झुरवले; म्हणाली 'इसमे तेरा घाटा'

नेहा कक्करने एक्स बॉयफ्रेंडला झुरवले; म्हणाली ‘इसमे तेरा घाटा’

Subscribe

प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने आपल्या एक्स बॉयफ्रेंडला झुरवण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी तिने सोशल मिडियावर एक व्हिडिओ टाकला आहे. हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध गायिका नेहा कक्करला प्रेमभंगाचा त्रास सतावत आहे. अभिनेता हिमांश कोहलीसोबत झालेल्या प्रेम विरहानंतर गायनाच्या लाईव्ह कार्यक्रमामध्ये तिच्या डोळ्यांमध्ये पाणी आलेलं प्रेक्षकांनी पाहिलं आहे. आयुष्याच्या एका टप्प्यावर अनेकांना प्रेम आणि त्यातून होणाऱ्या विरहचा सामना करावा लागतो. या परिस्थितीतून बाहेर येणे फार महत्त्वाचे आहे. नेहा कक्कर देखील या परिस्थितीतून बाहेर येताना दिसत आहे. यावेळी आपण काहीतरी स्पेशल आहोत आणि आपल्याला गमावून समोरच्याचं फार मोठं नुकसान झालं आहे, अशी भावना मनामध्ये निर्माण होते. अगदी तशीच भावना सध्या नेहा कक्करच्या मनात सुरु आहे. नेहा कक्करने तिचा एक्स बॉयफ्रेंडला झुरवण्यासाठी एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल केला आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘इसमे तेरा घाटा, मेरा कुछ नही जाता’ हे गाणं गाताना दिसत आहे.

व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद

नेहा कक्कडचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. नेहाच्या चाहत्यांना हा व्हिडिओ प्रचंड आवडत आहेत. नेहा प्रेमभंगाच्या त्रासातून बाहेर येताना दिसत आहे, अशा प्रतिक्रियादेखील उमटताना दिसत आहेत. दरम्यान, या गाण्यामध्ये नेहा कक्कड फार सुंदर हावभाव करताना दिसत आहे. त्याचबरोबर व्हिडिओमध्ये ती नृत्यदेखील करत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नेहा कक्कडला सतावतोय प्रेमभंगाचा त्रास

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -