घरमनोरंजनगायतोंडे म्हणतोय 'इस बार भगवान भी नही बच सकता'; सेक्रेड गेम्स रिटर्न

गायतोंडे म्हणतोय ‘इस बार भगवान भी नही बच सकता’; सेक्रेड गेम्स रिटर्न

Subscribe

इंटरनेटवर धुमाकुळ घालणारी नेटफ्लिक्सची वेबसिरीज आता लवकरच प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लीक्सने दुसऱ्या सीझनची आज अधिकृत घोषणा केली आहे. आज युट्यूबसह फेसबुकवर नेटफ्लीक्सने दुसऱ्या सीझनची घोषणा करणारा एक व्हिडिओ रिलीज केला. त्यामुळे दुसऱ्या सीझनची उत्कंठा वाढली आहे. गायतोंडे परत येतोय अशा कमेंट्स त्यावर येऊ लागल्या आहेत. २५ दिवसांत हे मुंबई शहर बेचिराख होणार असल्याची धमकी गणेश गायतोंडेने पोलीस ऑफीसर सरताच सिंगला दिली होती. सरताजचा मुंबई वाचवण्यासाठीचा प्रवास सुरू असताना पहिला सीझन संपला. त्यामुळे जगभरातील लोकांना दुसऱ्या सीझनची उत्कंठा लागली होती. आता दुसरा सीझन लवकरच येणार असल्याचे नेटफ्लीक्सने जाहीर केले आहे. प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी आता टीझरदेखील प्रदर्शित करण्यात आला आहे.

 

- Advertisement -

पच्चीस दिन है तुम्हारे पास!

नवाजुद्दीन सिद्दीकीने रंगवलेला गणेश गायतोंडे पुन्हा एकदा पाहण्यासाठी चाहते अक्षरशः वेडे झाले आहेत. लोकप्रिय दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी ही वेबसिरीज दिग्दर्शित केली आहे. यामध्ये नवाजुद्दीन सिद्दिकी (गणेश गायतोंडे), सैफअली खान (सरताज सिंग) हे दोघे प्रमुख भूमिकेत आहेत. गायतोंडेने सांगितले होते की, सब मर जायेंगे, बस त्रिवेदी बचेगा. त्यामुळे दुसऱ्या सीझनमध्ये त्रिवेदी हे पात्र आपल्याला प्रमुख भूमिकेत पहायला मिळणार आहे. तसेच गायतोंडेचा तिसरा बाप म्हणजेच खन्ना गुरूजी (पंकज त्रिपाठी) देखील महत्त्वाच्या भूमिकेत पहायला मिळणार आहेत.

कधी होणार प्रदर्शित

नेटफ्लिक्सने टिझर रिलीज केला असला तरी दूसरा सीझन कधी प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर केलेले नाही. त्यामुळे काही चाहते नाराज झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -