घरमनोरंजनउलटी गिनती शुरू; या दिवशी सुरू होणार 'सेक्रेड गेम्स २'

उलटी गिनती शुरू; या दिवशी सुरू होणार ‘सेक्रेड गेम्स २’

Subscribe

‘सेक्रेड गेम्स 2’ टीमने हे पर्व कधी सुरू होणार याची हिंट नेटफ्लिक्सने दिली आहे. ही हिंट देताना नेटफ्लिक्सने बेबी फिल्टर कोलाजचा वापर केला आहे.

अभिनेता सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची मुख्य भुमिका असलेली ‘सेक्रेड गेम्स’ही वेबसिरीज लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. या वेबसिरीजचा दुसरा सिझन कधी येणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. सॅक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सिझनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तमाम चाहत्यांसाठी सहा एप्रिलला ‘सेक्रेड गेम्स २’चा प्रमो प्रदर्शित झाला. या प्रोमोला प्रेक्षकांनी चांगलीपसंती दिली.सेक्रेड गेम्स २ चा प्रमो बघितल्यानंतर दुसऱ्या सिझनची उत्सुकता वाढणार आहे. कारण ‘सेक्रेड गेम्स 2’मध्ये कल्की कोच्लिन आणि रणवीर शौरी या दोघांची एन्ट्री झालीय. हा सिझन कधी सुरू होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.

View this post on Instagram

25 din mein school shuru hone wala hain.

A post shared by Netflix India (@netflix_in) on

- Advertisement -

‘सेक्रेड गेम्स 2’ टीमने हे पर्व कधी सुरू होणार याची हिंट दिली आहे. ही हिंट देताना नेटफ्लिक्सने बेबी फिल्टर कोलाजचा वापर केला आहे. या कोलाजमध्ये कुकू (कुबरा सेट), काटेकर (जितेंद्र जोशी),बंटी (जतीन सरना) आणि अंजली माथूर (राधिका आपटे) आहेत. आणि हे कोलाज शेअर कराताना पुढच्या २५ दिवसात शाळा सुरू होणार आहे असं कॅप्शन दिलं आहे. याचाच अर्थ पुढच्या २५ दिवसात ‘सेक्रेड गेम्स 2’ सुरू होणार आहे.

View this post on Instagram

Ganesh Boytonde.

A post shared by Netflix India (@netflix_in) on

- Advertisement -

पहिल्या सीझनमध्ये गणेश गायतोंडेचा मरताना दाखवले होते. पण ‘सेक्रेड गेम्स 2’ तो परतताना दिसतोय.गणेश गायतोंडे ही भूमिका अभिनेता नवाजुद्दीनने साकारली होती. अद्याप ‘सेक्रेड गेम्स 2’ च्या रिलीज डेटची घोषणा झालेली नाही. ‘सेक्रेड गेम्स 2’मध्ये किती एपिसोड असणार, ते कधी टेलिकास्ट होणार, आणखी कोणते कलाकार असणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित केलेली ही सीरिज विक्रम चंद्रा यांच्या ‘सेक्रेड गेम्स’ या कादंबरीवर आधारित आहे. सैफ अली खान यात मुख्य भूमिकेत होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -