आता नेटफ्लिक्सवर फ्रीमध्ये पाहा वेबसीरिज आणि चित्रपट!

Netflix India announces free access for two days
आता नेटफ्लिक्सवर फ्रीमध्ये पाहा वेबसीरिज आणि चित्रपट!

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील नेटफ्लिक्सवर पुढच्या महिन्यात तुम्ही वेबसीरिज आणि चित्रपटांचा आनंद लूट शकता. पुढच्या महिन्यांच्या ५ आणि ६ तारखेला नेटफ्लिक्सने एक फेस्ट आयोजित केला आहे. या फेस्टमध्ये कोणीही नेटफिक्सवर दोन दिवसांसाठी मोफत काही पाहू शकते. म्हणजेच प्रेक्षक दोन दिवस विना सब्सक्रिप्शन शिवाय ओटीटी प्लॅटफॉर्मचा लाभ घेऊ शकतात.

नेटफ्लिक्स इंडियाने शुक्रवारी म्हटले की, ‘ते भारतात ५ आणि ६ डिसेंबरला ‘स्ट्रीमफेस्ट’ आयोजित करणार असून ज्या अंतर्गत जे लोक नेटफ्लिक्सचे ग्राहक नाही आहेत, ते मोफत नेटफ्लिक्स वापरू शकतात. या नेटफ्लिक्सच्या फेस्टचे उद्दीष्ट नवीन ग्राहक जोडणे आहे. सध्या नेटफ्लिक्सला भारतात Amazon, डिस्ने हॉटस्टार आणि जी ५ सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मसह टक्कर सुरू आहे.’

नेचफ्लिक्स इंडियाचे उपाध्यक्ष मोनिका शेरगिल ने एका ब्लॉगपोस्टमध्ये सांगितले की, ‘नेटफ्लिक्सद्वारे आम्ही भारतात मनोरंजन प्रेमींसाठी जगातील सर्वात अधिक अनोखी कहानी आणू इच्छित आहोत. यासाठी आम्ही ‘स्ट्रीमफेस्ट’ आयोजित करीत आहोत. ५ डिसेंबर रात्री १२ वाजल्यापासून ते ६ डिसेंबर रात्री १२ वाजेपर्यंत नेटफ्लिक्स मोफत आहे. भारतात कुठेही कोणीही सर्व ब्लॉकबस्टर चित्रपट, मोठ्या वेबसीरिज, अॅवार्ड विजेत्या डॉक्युमेंट्री या दोन दिवसात पाहू शकतात.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

त्या पुढे म्हणाल्या की, ‘जे नेटफ्लिक्सचे ग्राहक नाही आहेत, ते आपले नाव, ई-मेल किंवा फोन नंबर आणि पासवर्डसह साइनअप करू शकतात. एकही पैसा न मोजता स्ट्रिमिंग सुरू करू शकतात. फक्त एवढेच आहे. तसेच जर तुमच्या ई-मेल आयडीवर पहिल्यापासून नेटफ्लिक्सची मेंबरशीप आहे तर तुम्हाला स्ट्रिमिंग तिथून असेल जिथे तुम्ही सब्सक्रिप्शन बंद केले होते.’


हेही वाचा –  बिग बॉसच्या घरात मुन्ना भैया आणि एकता कपूरची एंट्री