सेक्रेडमधील ‘या’ कलाकारांच्या आठवणींना नेटफ्लिक्सकडून उजाळा

अवघ्या दोन दिवसानंतर म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर सेक्रेड गेम्स २ प्रदर्शित होणार आहे.

Mumbai
सेक्रेड गेम्स

बाहुबली चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची जेवढी उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. तितकीच किंबहुना त्याहून अधिक उत्सुकता सेक्रेड गेम्स २ या वेबसीरिजची प्रेक्षकांना लागून राहिली आहे. मात्र आता प्रेक्षकांची प्रतिक्षा संपणार आहे. अवघ्या दोन दिवसानंतर म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर सेक्रेड गेम्स २ प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे नेटफ्लिक्सनेही पहिल्या भागाच्या आठवणींना उजाळा देण्यास सुरुवात केली आहे. नेटफ्लिक्सच्या यु ट्यूब चॅनेलवर आधी काटेकर आणि आता कांताबाई यांच्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांच्या आठवणींना उजाळा देणारे व्हिडिओज शेअर करण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा काटेकर आणि कांताबाई यांच्या भूमिकांची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. सेक्रेड गेम्समधील सरदार आणि गायतोंडे यांच्या प्रमुख भूमिका असल्या तरीही अनेक सहाय्यक कलाकारांच्या भूमिकादेखील प्रेक्षकांच्या तितक्याच लक्षात राहिल्या आहेत. त्यापैकीच काटेकर आणि कांताबाई या दोन व्यक्तिरेखा आहेत.

अभिनेता सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची मुख्य भुमिका असलेली ‘सेक्रेड गेम्स’ही वेबसिरीज लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. या वेबसिरीजचा दुसरा सिझन कधी येणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. सॅक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सिझनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तमाम चाहत्यांसाठी सहा एप्रिलला ‘सेक्रेड गेम्स २’चा प्रोमो प्रदर्शित झाला. या प्रोमोला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली. सेक्रेड गेम्स २ चा प्रोमो बघितल्यानंतर दुसऱ्या सिझनची उत्सुकता वाढली. ‘सेक्रेड गेम्स २’मध्ये कल्की कोच्लिन आणि रणवीर शौरी या दोघांची एन्ट्री झाली आहे. अखेर हा सिजन १५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा –

‘सेक्रेड गेम्स २’ साठी नवाजुद्दीने घेतले ‘एवढे’ मानधन!

उलटी गिनती शुरू; या दिवशी सुरू होणार ‘सेक्रेड गेम्स २’

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here