दीपिकाच्या घरी येणार नवा पाहुणा?

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणबाबत सोशल मीडिया पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आले आहे. दीपिकाचे चाहते तु गर्भवती आहे का? असे प्रश्न विचारत आहेत.

Mumbai
Netizens ask Deepika Padukone if she is pregnant as she shares stunning pictures on her Instagram
दीपिकाच्या घरी येणार नवा पाहुणा?

काही महिन्यांपूर्वी गाला २०१९ मधील सोहळ्याचा बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोमध्ये प्रियांका चोप्रा आणि पती निक जोनसोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण दिसून आली होती. हा दीपिकाचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या फोटोमुळे दीपिका गर्भवती असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, तिने एका मुलाखतीत ‘मी वेळ आल्यावर आई होण्याचा विचार करेल’, असे म्हणत तिने या चर्चेला पूर्णविराम दिला होता. मात्र, आता पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर केले आहेत. सध्या हे फोटो देखील सोशल मीडियावर फारच व्हायरल होत आहेत. हे फोटो आयफा पुरस्कार सोहळ्या दरम्यानचे आहेत. या फोटोमध्ये दीपिका जांभळ्या रंगाच्या फेदर गाऊनमध्ये फारच सुंदर दिसत आहे. पण या फोटोमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. दीपिकाच्या चाहत्यांनी ‘तू गर्भवती आहे का?’ असा प्रश्न तिला विचारला आहे.

आयफा पुरस्कार सोहळ्यातील दीपिकाच्या या फोटोमध्ये तिने एक हात कमरेवर घेऊन पोझ दिली आहे. या फोटोमध्ये तिचे पोट काही प्रमाणात वाढल्यासारखे दिसत आहे. यावरून तिच्या चाहत्यांनी दीपिकाकडे गोड बातमी असल्याचा अंदाज बांधला आहे. पती अभिनेता रणवीर सिंगनेदेखील दीपिकाच्या या फोटो प्रतिक्रिया दिली आहे. या फोटोवर रणवीरने अशी प्रतिक्रिया लिहिली आहे की, ‘बेबी तु मला मारून टाकशील.’

View this post on Instagram

I purple you…?

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

सध्या दीपिका ही पती रणवीर सिंगसोबत ‘८३’ या चित्रपटाचे चित्रिकरण करण्यात व्यस्त आहे. या चित्रपटात ती कपिल देवची पत्नी रोमी देव या भूमिकेतून दिसणार आहे. तसेच त्यानंतर दीपिका ‘छापाक’ या चित्रपटात अॅसिड अटॅकमध्ये वाचलेली लक्ष्मी अग्रवालच्या भूमिकेतून बघायला मिळणार आहे.