कियाराला ‘मॅगी’ची उपमा; तिने नेटकऱ्यांना दिले मजेशीर उत्तर

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी हिला नेटकऱ्यांनी मॅगीची उपमा दिली आहे. यावर कियाराने देखील नेटकऱ्यांना मजेशीर उत्तर दिले आहे.

Mumbai
कियाराला 'मॅगी'ची उपमा

‘एम.एस.धोनी’, ‘कबीर सिंग’ यांसारख्या चित्रपटातून बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. कियारा हिने नुकतेच फोटोशूट केले आहेत. या फोटोशूटचे फोटो कियाराने तिच्या इन्साग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. त्यापैकी एका फोटोने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले असून नेटकऱ्यांनी तिची चांगलीच खिल्ली उडवली आहे. तसेच तिने घातलेल्या ड्रेसवरुन नेटकऱ्यांनी तिला ‘मॅगी’ अशा नावाने चिडवले आहे. पण या ट्रोलर्सना कियाराने मजेशीर उत्तर देऊन दिले आहे आहे.

View this post on Instagram

🌼

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

अटेलिअर झुहराने डिझाइन केलेला पिवळ्या रंगाचा गाऊन घालून कियाराने फोटोशूट केले आहे. खास फोटोशूटसाठी तिने तो गाऊन परिधान केला होता. या गाऊनची डिझाइन पाहून नेटकऱ्यांनी त्याची ‘मॅगी’ न्यूडल्सशी तुलना केली आहे. ‘जेव्हा तुम्हाला मॅगी फार आवडते’ अशी कमेंट एकाने केली तर दुसऱ्या युजरने म्हटलं, ‘जेव्हा तुम्ही मॅगी खाऊन कंटाळता आणि त्याचा गाऊन बनवता. अन्न वाया न जाण्यासाठी सर्वोत्तम पर्याय.’ नेटकऱ्यांची विनोदबुद्धी पाहून कियाराने तिच्या अंदाजात उत्तर दिलं आहे. ‘दोन मिनिटांत तयार झाले,’ असं तिने म्हटलं आहे.

‘गुड न्यूज’ या चित्रपटातून झळकणार

‘एम. एस. धोनी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी कियारा ‘लस्ट स्टोरीज’ या नेटफ्लिक्सवरील वेब सीरिजमुळे प्रकाशझोतात आली आहे. तसेच कियारा लवकरच एका ‘गुड न्यूज’ या चित्रपटात झळकणार असून यामध्ये ती अक्षय कुमार, करीना कपूर आणि दिलजित दोसांज यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. याशिवाय ‘लक्ष्मी बॉम्ब’ आणि ‘शेरशाह’ असे दोन चित्रपट तिच्या हातात आहेत.


हेही वाचा – मुंबईत कोसळणाऱ्या पावसात अडकल्या रेणूका शहाणे!