योगापेक्षा नमाज पठण कर; नेटीझन्सचा हिना खानला सल्ला

सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहणारी हिना खान कालपासून पुन्हा एकदा चर्चेत आहे. तिने तिचे काही योगासने करतानाचे फोटे अपलोड केले आहेत. त्यावरुन हिनाचे कौतुक होण्याऐवजी तिला ट्रोल केले जात आहे.

Heena Khan
हिना खान

सेलिब्रिटी सोशल मीडियावर जे काही अपडेट करत असतात, त्यावर फॅन्स आणि हेटर्स नेहमी व्यक्त होत असतात. सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्ट्समुळे अनेक सेलिब्रिटींना ट्रोल केले जाते. काही ठराविक सेलिब्रिटी ट्रोल्सना नेहमी बळी पडतात. त्यामध्ये प्रामुख्याने टिव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री हिना खानचे नाव घ्यावे लागेल. सध्या ती पुन्हा एकदा ट्रोल होत आहे. परंतु यावेळी काहिही चूक नसताना हिना टिकेची धनी झाली आहे. जागतिक योगदिनानिमित्त अनेकांनी स्वत:चे योगासने करत असातानाचे फोटो अपलोड केले. हिनानेदेखील तिचे योगासने करतानाचे फोटो क्लिक केले व ते फोटो इन्स्टग्रामवर अपलोड केले. परंतु काही नेटिझन्सनी त्यावर आक्षेप घेतला आहे. अनेकांना हिनाचे योगासने करणे आवडलेले नाही. हिनाची योगासने पाहुन तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही. मुस्लिम असल्याने योगा करण्यापेक्षा नमाज पठण करायला हवे असा सल्ला तिला इन्स्टाग्रामवर दिला गेला आहे. अनेक नेटकऱ्यांनी तिला नमाज पठण करण्याचा सल्ला दिला. एकाने तर तिला ‘नमाज पठण करणं हा देखील एक उत्तम योग प्रकार’ असल्याचं सांगितलं.

नृत्याच्या व्हिडिओनंतरही झाली होती ट्रोल

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रमजानचा महिना सुरु असताना हिनाने तिचा एक नृत्य करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. हा व्हिडिओ पाहताच अनेकांनी तिला संस्कार आणि संस्कृतीची आठवण करुन दिली होती. रमजान सुरु असताना तिचे हे कृत्य चुकीचे असल्याचेही अनेकांचे म्हणणे होते. अशा आशयाच्या कमेंट्स तिच्या व्हिडिओवर लोकांनी केल्या होत्या.

हिना खान ही सोशल मीडियावर सतत अॅक्टीव्ह असते. ती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अनेक वेळा नृत्य करतानाचे, व्यायाम करतानाचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. नेहमीप्रमाणे तिने योगदिनानिमित्त फोटो अपलोड केले होते. नेहमी हिनाच्या चुकांमुळे, माध्यमांवरील प्रतिक्रियांमुळे तिला ट्रोल केलं जातं. परंतु यावेळी तिची चूक नसताना तिला टिकेला सामोरे जावे लागले आहे.