घरमनोरंजनमराठी बिग बॉसच्या घरात भरणार 'कुशन' बाजार

मराठी बिग बॉसच्या घरात भरणार ‘कुशन’ बाजार

Subscribe

बिग बॉस मराठीच्या घरात आज “मिशने ए कुशन” नावाचा कुशन बाजार भरविण्यात येणार आहे.कॅप्टनसीच्या प्रक्रियेत या टास्कची मोलाची भूमिका असणार आहे. हा टास्क पूर्ण केल्यानंतर बिग बॉस सर्व सदस्यांना लक्झरी बजेट देणार आहे.

big Boss1
बीग बॉस मराठीचे घर (फोटो सौजन्य – कलर्स मराठी वाहिनी)

नेमका टास्क काय?
या टास्क अंतर्गत रेशम आणि सई कुशन फॅक्टरी चालवणाऱ्या दोन प्रतिस्पर्धी व्यापारी असणार आहेत. घरातील इतर सर्व सदस्य या कार्यामध्ये उशा बनविणारे कर्मचारी असतील. टास्कदरम्यान बिग बॉस वेळोवेळी उशा बनविण्याच्या ऑर्डर्स देतील. हि ऑर्डर व्यापाऱ्यांनी कर्मचाऱ्यांकडून पूर्ण करून घ्यायची आहे. त्यामुळे आता घरातील सदस्य हे कार्य कसे पार पाडतील? कोणामध्ये वाद होतील? कोणते सदस्य रेशमच्या बाजूने काम करतील? तर कोणते सईच्या ?  या टास्कदरम्यान मेघा आणि रेशम मध्ये वाद रंगण्याची शक्यता आहे.

- Advertisement -
big boss2
बीग बॉस मराठी (फोटो सौजन्य – कलर्स मराठी वाहिनी)

हे सदस्य झाले नॉमिनेट

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल सदस्यांना “हाजीर तो वझीर” हा नॉमिनेशन टास्क दिला होता. त्यानुसार सेफ झोनमध्ये फक्त चारच सदस्य असू शकतात. ज्यामध्ये मेघा, पुष्कर, सई आणि शर्मिष्ठा हे चार सदस्य प्रथम त्या सेफ झोन मध्ये जाऊन बसले. त्यानंतर या प्रक्रियेनुसार बिग बॉस सहा बझर वाजवणार आणि प्रत्येक बझरला कोणी एका सदस्याने त्या सेफ झोन मधून बाहेर येणे अनिवार्य होते तसेच बाहेरील सदस्यांपैकी कोणी एक सदस्य सेफ झोन मध्ये जाणे अपेक्षित होते. काल सेफ झोन मधून मेघा, आस्ताद, रेशम आणि त्यागराज बाहेर आले. आज कोण नॉमिनेट होणार? कोण सुरक्षित होणार? हे बघणं महत्त्वाचं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -