घरमनोरंजनखंडोबानंतर प्रेक्षकांना मिळणार दख्खनच्या ज्योतिबाचं दर्शन

खंडोबानंतर प्रेक्षकांना मिळणार दख्खनच्या ज्योतिबाचं दर्शन

Subscribe

२३ ऑक्टोबर पासून संध्याकाळी ६:30 वाजता स्ट्रार प्रवाह वर प्रेक्षकांना ही मालिका पाहता येणार आहे.

झी मराठी वरील जय मल्हार मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. जय मल्हार मालिकेतून जेजुरीच्या खंडोबाची कथा प्रेक्षकांना पहायला मिळाली होती. जय मल्हारच्या यशानंतर ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २३ ऑक्टोबर पासून संध्याकाळी ६:30 वाजता स्ट्रार प्रवाह वर प्रेक्षकांना ही मालिका पाहता येणार आहे. मालिकेचा पहिला लुक दिग्दर्शक, निर्माते महेश कोठारे यांनी त्यांच्या सोशल मीडियवरून प्रदर्शित केला आहे.

 

View this post on Instagram

 

ज्योतिबाच्या नावानं चांगभलं !! येतोय ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ २३ ऑक्टोबर पासून सायं. ६:३० वाजता, Star प्रवाह वर. #DakhkhanchaRajaJyotiba #StarPravah @star_pravah @kotharevision @adinathkothare @urmilakothare @vishhalnikam1

- Advertisement -

A post shared by Mahesh Kothare (@maheshkothare) on

- Advertisement -

दख्खनचा राजा ज्योतिबा या पौराणिक मालिकेच्या रूपात प्रेक्षाकांना ज्योतिबाचे दर्शन होणार आहे. मराठी अभिनेता ‘विशाल निकम’ हा ज्योतिबाच्या भूमिकेत दिसणार आहे.या भूमिकेसाठी विशालने खुप मेहनत घेतली आहे. ज्योतिबाची भूमिका साकारण्यासाठी विशालने २० दिवसात १२ किलो वजन कमी केल्याचे सांगितले आहे. या आधी अभिनेता विशाल निकम हा स्ट्रार प्रवाहवरिल ‘साता जन्माच्या गाठी’ या मालिकेत प्रमुख भुमिकेत दिसला होता.
काय म्हणाले महेश कोठारे ?
मालिकेच्या शुटींगसाठी कोल्हापूरात भव्यदिव्य सेट उभारण्यात आला आहे. कलादिग्दर्शक संतोष फुटाणे आणि त्यांची टिम सेट उभारण्याचे काम करत आहेत. जवळपास दिड महिन्यांपासून सेट बनवण्याचे काम सुरू आहे. सेट साठी लागणाऱ्या सर्व गोष्टी या मुंबई मधून ट्रान्सपोर्ट कराव्या लागत आहेत. ज्योतिबाचा महाल, महालक्षीचा महाल, आश्रम, गाव, क्रोमा फ्लोअर या सगळ्यांचा सेटमध्ये समावेश असल्याचे महेश कोठारे यांनी सांगितले.

विशेष म्हणजे मालिकेत वापरण्यात येणारे कपडे आणि दागिने यासाठी खास रिसर्च करण्यात आला आहे. यासाठी निलीमा कोठारे आणि नीता खांडके यांच्या एन क्रिएशन्सचं खुप कौतुक करण्यात येत आहे.


हेहि वाचा- बिग बींनी उचललं मोठं पाऊल, चाहत्यांनी केलं कौतुक!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -