घरमनोरंजनस्वप्निल जोशी 'या' मालिकेतून करणार छोट्या पडद्यावर कमबॅक

स्वप्निल जोशी ‘या’ मालिकेतून करणार छोट्या पडद्यावर कमबॅक

Subscribe

ग्लॅमरस कलाकारांनी भरलेली जिवलगा ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वप्नील जोशी आणि ‘हँडसम हंक’ सिद्धार्थ चांदेकर ग्लॅमरस अदाकारीने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर ही ‘जिवलगा’मधून पहिल्यांदाच मालिकेतून झळकणार आहे. मधुरा देशपांडे सुद्धा या मालिकेतून वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येईल.

“जो डोळे बंद केल्यावरही दिसतो, तो जिवलगा…ज्याच्यामुळे आपण आहोत, तो जिवलगा…,”अशा आशयाची ही प्रेमकथा आहे. “स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर, अमृता खानविलकर आणि मधुरा देशपांडे यांच्या सशक्त अभिनयाने आणि ग्लॅमरने ही मालिका सजली आहे. स्वप्नील जोशी आपल्या या पुनरागमनाबद्दल बोलताना म्हणाला, “मी ‘जिवलगा’मधील माझ्या भूमिकेबाबत खूपच उत्साही आहे. आज मी जो काही आहे तो टीव्हीमुळेच आहे. खूप वर्षांनंतर मी मालिका करतोय. मी आणि स्टार प्रवाहची संपूर्ण टीम ही मालिका आपल्यासमोर आणण्यासाठी उत्साही आहोत. यात विश्वास नावाच्या लेखकाची व्यक्तिरेखा मी साकारतोय. मागून काहीही मिळत नाही ते कमवायला लागतं यावर विश्वास ठेवणारा हा विश्वास आहे.

- Advertisement -

‘जिवलगा’मध्ये नातेसंबंधांचे अनेक पैलू उलगडत गेलेले प्रेक्षकांना पाहायला मिळतील. मानवी स्वभाव आणि त्यात दाखविलेली प्रगल्भता व विचार करण्याची पद्धत यांची एक वेगळी शैली या कथेतून पुढे येणार आहे. बऱ्याचदा आपली नाती समजून घेण्याची आणि त्यांचे मूल्यमापन करण्याची पद्धत चुकते. आपल्या अवतीभवती असलेल्या माणसांबद्दलचे आपले अंदाज चुकतात. याचा गोष्टींवर ही कथा प्रकाश टाकते. प्रेमामध्ये काय ताकद असते, हेसुद्धा या कथेतून अधोरेखित होते. त्यामुळे ही कथा प्रत्येक घरातील प्रेक्षकाला आपलीशी वाटेल.

- Advertisement -

‘स्टार प्रवाह’ने आपल्या स्थापनेपासूनच दर्जेदार मराठी मालिका आणि कार्यक्रम देण्यावर भर ठेवला आहे. ‘जिवलगा’ ही मालिकाही आपलं वेगळेपण नक्कीच अधोरेखित करेल. या मालिकेत अनेक आघाडीचे, गुणी आणि लोकप्रिय कलाकार आहेत, त्यामुळे या मालिकेबद्दल बरीच उत्सुकता निर्माण झालीय. तेव्हा पाहायला विसरु नका ‘जिवलगा’ ८ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -