येत्या ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा प्रियकर अमेरिकन सिंगर निक जोनास यांचा विवाह संपन्न होणार आहे. हा विवाह राजस्थानमधील जोधपूरच्या उम्मेदभवन पॅलेस या ठिकाणी संपन्न होणार आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा, दिपिका पदुकोन आणि रणवीर सिंग यांच्या लग्नानंतर आता प्रियांका आणि निक जोनस यांच्या लग्नाविषयीच्याही चर्चांना उधान आले आहे. परंतु, आता त्यांच्या लग्नाअगोदर निक जोनास संबंधिक एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही माहिती त्याने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दिली आहे. निक हा मधुमेहग्रस्त आहे. त्याला ‘टाईप १’चा मधुमेह आहे. त्याने या पोस्टमध्ये स्वत:चे दोन छायाचित्र देखील टाकले आहेत. यामधील एका छायाचित्रात त्याचा तेरा वर्ष पूर्वीचा चेहरा आहे तर दुसऱ्या छायाचित्र त्याचा लूक दिसत आहे.
हेही वाचा – प्रियांका-निकचे Wedding Photos १८ कोटींना?
काय म्हणाला निक?
निकने इन्स्टाग्रामवर लिहिले आहे की, १३ वर्षापूर्वी त्याला ‘टाईप१’चा मधूमेह झाल्याचं निदान झालं होते. त्यामुळे त्याचे वजन कमी झाले होते. त्याच्या रक्तात साखरेचे प्रमाण खूप वाढले होते. आपण डॉक्टरांकडे उपचारासाठी गेल्यावर आपल्याला मधुमेहाचे निदान झाल्याची माहिती मिळाली असल्याचही तो म्हणाला. आता त्याची प्रकृती स्वस्थ आणि मस्त असल्याचही तो सांगतो. प्रकृती स्वस्थ राहण्यासाठी आपण योग्य ती काळजीही घेत असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे या आजारावर आपण पुर्णपणे नियंत्रण मिळवल्याचे त्याने म्हटले आहे. याशिवाय शेवटी त्याने आपल्या कुटुंबियांचे आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांचे आभार मानले आहेत.
हेही वाचा – प्रियांका-निकचे Wedding Photos १८ कोटींना?