प्रियांका – निकचा रिसेप्शन सोहळा!

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा रिसेप्शन सोहळा दिल्लीत पार पडला असून या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती दर्शवली.

Mumbai
priyanka and nick
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास (सौजन्य-एएनआय)

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिचा शाही लग्न सोहळा पार पडल्यानंतर आज दिल्लीतील ताज पॅलेसमध्ये ग्रँड रिसेप्शनदेखील संपन्न झाले. या सोहळ्याला मित्रपरिवार आणि काही खास पाहुण्यांनी हजेरी लावली. आजच प्रियांका आणि निक यांचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता त्यांच्या रिसेप्शनच्या फोटोचीही जोरदार चर्चा आहे. प्रियांका भारतीय लुक आणि निकचा ब्लॅक कोट यामुळे दोघही लक्षवेधी ठरत आहेत. विशेष म्हणजे दोघांच्या रिसेप्शनमध्येही तोच लोको दिसतोय जो त्यांच्या रोखानंतर झालेल्या सोहळ्यामध्ये पाहायला मिळाला होता. या लोगोमध्ये दोघांच्या नावचे आद्याक्षर एन आणि पी आहेत.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली. यावेळी नवोदित जोडप्याशी मोदी गप्पा मारताना दिसत आहेत.

priyanka and nick
प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी

वाचा : प्रियांका-निकच्या लग्नाचा फोटो अल्बम आला हो…!

देसी गर्ल प्रियंकाच्या स्वागतासाठी घर सजले

प्रियंका चोप्रा – निक जोनस प्रेमबंधनात

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here