अनुष्का शेट्टी यांच्या ‘नि: शब्दम’ चा फर्स्ट लुक प्रदर्शित

hyderabad
Anushka Shetty
अनुष्का शेट्टी

अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्या आगामी ‘नि:शब्दम’ चित्रपटाचा फर्स्ट लुक आज, बुधवारी प्रदर्शित करण्यात आला आहे. नि:शब्दममध्ये अनुष्का ‘साक्षी’ या भूमिकेत दिसणार आहेत. नि:शब्दम तेलुगू, तामिळ, हिंदी आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नि:शब्दम् चित्रपटाद्वारे आर. माधवन म्हणजेच रंगनाथन माधवन आणि अनुष्का शेट्टी यांची जोडी ‘रेंडू’ नंतर पुन्हा एकत्र येणार आहे. अनुष्का शेट्टी आणि आर. माधवन शिवाय या चित्रपटात अभिनेत्री अंजली, शालिनी पांडे, माइकल मॅडसन आणि सुब्बाराजू सारखे मोठ-मोठे कलाकार आहेत.

नि:शब्दमचे दिग्दर्शन हेमंत मधुकर करणार आहेत, तर निर्मिती कोना वेंकट यांच्या कोना फिल्म फॅक्टरी या निर्मिती संस्थेद्वारे केली आहे. अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्या आगामी ‘नि:शब्दम’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून आता चाहत्यांचे लक्ष प्रदर्शनाकडे लागले आहे. एस. एस. राजामौली यांच्या बाहुबली चित्रपटानंतर अनुष्का शेट्टी काही दिवस रुपेरी पडद्यापासून दूर होत्या. २०१७ साली प्रदर्शित झालेल्या ‘भागामती’ चित्रपटनंतर जवळपास एक वर्षाने अनुष्का शेट्टी यांच्या आगामी चित्रपटाबाबत जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.