प्रियांका-निकच्या लग्नात बॉलीवूडला ‘नो एंट्री’?

रिपोर्टनुसार विवाहसोहळ्यात केवळ प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सचे कुटुंबिय आणि काही निकटवर्तीयच विवाह सोहळयाला उपस्थित राहणार आहेत.

Mumbai
प्रियांका चोप्राच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता (फाईल फोटो)

देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोन्स यांच्या ग्रँड वेडिंगकडे सध्या सगळ्या जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. या दोघांच्या चाहत्यांसह संपूर्ण बॉलीवूड आणि हॉलीवूड इंडस्ट्रीसुद्धा त्यांच्या लग्नासाठी उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वीच या दोघांचा साखरपुडा पार पडला होता आणि या महिन्याच्या अखेरीस हे दोघं लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यासोबतच बॉलीवूड स्टार्सना प्रियांका-निकच्या लग्नाचं आमंत्रण नसल्याची चर्चाही रंगते आहे. बॉलीवूडच्या एकाही कलाकाराला प्रियांका आणि निकच्या लग्नसोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आलं नसल्याचीन ताजी माहिती मिळते आहे. मध्यंतरी एका खासगी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, देसी गर्लच्या लग्नामध्ये सलमान खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, फरहान खान आणि कॅटरिना कैफ आदी सिनेस्टार्स सहभागी होणार होते. मात्र, आता या नव्या रिपोर्टनुसार विवाहसोहळ्यात केवळ प्रियांका आणि निकचे कुटुंबिय आणि काही निकटवर्तीयच उपस्थित राहणार आहेत. आता यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असणार हे नक्की. दरम्यान अशीही माहिती मिळते आहे की, प्रियांका आणि निक लग्नानंतर बॉलीवूड स्टार्ससाठी मुंबईमध्ये एका ग्रँड रिसेप्शनचं आयोजन करणार आहेत. मात्र याविषयी अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.


पाहा: प्रियांका चोप्राचा Hot अॅण्ड Glamorous लूक

उपलब्ध माहितीनुसार, ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या काळात जोधपूरमध्ये प्रियांका आणि निकचा शही विवाह सोहळा पार पडेल. ३० नोव्हेंबरला संगीत सोहळ्याने याची सुरुवात होणार आहे. प्रियांकाच्या संगीत सोहळ्यात प्रियांका आणि निक स्वत:देखील धमाकेदार डान्स परफॉर्मन्स करणार आहेत. तर, निक खास प्रियांकासाठी रोमँटिक साँग गाणार असल्याची माहितीही मिळते आहे. दरम्यान, प्रत्यक्षात आता हा सोहळा कसा रंगतोय हे पाहाणं रंजक ठरणार आहे.

विवाहपूर्व सोहळ्यांना सुरुवात

प्रियांकाने बॉलीवूड सोबतच हॉलीवूडमध्येही बरंच काम केलं आहे. मग तो ‘बेवॉच’ सारखा चित्रपट असो किंवा ‘क्वॉंटिको’सारखी सुपरहिट मालिका. नुकतंच काही दिवसांपूर्वी प्रियांकाच्या अमेरिकन मित्रांनी आणि तिच्या सहकलाकारांनी तिच्यासाठी खास ‘ब्राईडल शॉवर पार्टी’चे आयोजन केले होते. या पार्टीतील प्रियांकाचा बोल्ड आणि ग्लॅमरस लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या पार्टीमध्ये प्रियांकाची आई आणि तिचे अमेरिकेतील कोस्टार्स सहभागी झाले होते. यावेळी खास ‘पीसी’ स्टाईल सेलिब्रेशन करण्यात आले. प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनीही या पार्टीमध्ये प्रियांकासोबत ठुमके लवगावले. देसी गर्लच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर या ‘ब्राईडल शॉवर’ पार्टीचं आयोजन करण्यात आलं होत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here