घरमनोरंजनबिग बॉसमधील नॉमिनेशन प्रक्रियेला मिळणार अनपेक्षित वळण...

बिग बॉसमधील नॉमिनेशन प्रक्रियेला मिळणार अनपेक्षित वळण…

Subscribe

बिग बॉस मराठीच्या घरामधून रविवारी जुई गडकरी बाहेर पडली. तिचं असं घराबाहेर जाणं काहींना खटकलं तर काहींना योग्य वाटलं. ५० दिवस जुई बिग बॉसच्या घरामध्ये राहत होती. जुई घराबाहेर गेल्याने तिची कमतरता घरामध्ये जाणवणं साहजिकच आहे. यासंदर्भात सुशांत आणि स्मितामध्ये यावरूनच चर्चा होताना आज बघायला मिळणार आहे. सुशांतला जुईचं घराबाहेर जाणं पटलं नाही. “सईची लोकप्रियता इतकी आहे का? की जुई घराबाहेर गेली? सईने १५ दिवस घरामध्ये काहीच केलं नाही.” असं सुशांत आज स्मिताला सांगणार आहे.

काय आहे नॉमिनेशन प्रक्रिया

- Advertisement -

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज नॉमिनेशन प्रक्रीयेला सुरुवात होणार आहे. या प्रक्रियेमध्ये गार्डन एरियामधील सेफ झोनमध्ये प्रथम जे चार सदस्य जातील ते चार सदस्य या आठवड्यातील घराबाहेर पडण्याच्या प्रक्रियेमधून सुरक्षित होतील. ज्यामध्ये मेधा, पुष्कर, सई आणि शर्मिष्ठा हे चार सदस्य प्रथम त्या सेफ झोनमध्ये जाऊन बसणार आहेत. त्यामुळे या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रियेला अनपेक्षित वळण येणार आहे. बिग बॉस आज घरातील सदस्यांना “हाजीर तो वझीर” हे कार्य देणार आहेत. या कार्यानुसार सेफ झोनमध्ये फक्त चारच सदस्य असू शकतात. नक्की हे कार्य काय आहे ? खरोखरच हे चार सदस्य सुरक्षित आहेत का? नॉमिनेशन मधून सुरक्षित होण्यासाठी कोणामध्ये होणार वाद? कोण होणार सुरक्षित? कोणती युक्ती बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य वापरणार? हे आज पहायला मिळणार आहे.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -