घरमनोरंजनअभिनेत्री नोरा फतेहीचा अरेबिक 'दिलबर'!

अभिनेत्री नोरा फतेहीचा अरेबिक ‘दिलबर’!

Subscribe

अभिनेत्री नोरा फतेही सध्या तिच्या दिलबर गाण्याच्या अरेबिक स्टाईलमधील गाण्यावर काम करत असून लवकरच हे गाण प्रेक्षकांच्या भेटील येणार आहे.

बॉलीवूड अभिनेत्री आणि नृत्यांगणा नोरा फतेहीचा नुकताच प्रदर्शीत झालेल्या सत्यमेव जयते चित्रपटातील ‘दिलबर…’ हे गाण चांगलच गाजल होत. या गाण्याला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळाली होती. आता या गाण्याला अरेबिक तडका लागणार असून हे गाणं नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या नोरा या गाण्याच्य एडिटिंगमध्ये व्यग्र असून नवीन गाण्याला देशभरात प्रदर्शीत केले जाणार आहे.

dilbar-nora fatehi
नोरा फतेहीचा अरेबिक दिलबर (सौजन्य-कॅच)

दिलबर गाण्याला तुफान लोकप्रियता 

१५ ऑगस्ट २०१८ ला अभिनेता जॉन अब्राहम अभिनीत ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. यामधील नोरा फतेही हिच्यावर ‘दिलबर…’ हे गाणं चित्रीत करण्यात आलं होत. गाण्यातील बेले डान्स आणि तिच्या अदा प्रेक्षकांना चांगल्याच भावल्या होत्या. खरतर हे गाणं सिर्फ तुम या ९० च्या दशकातील चित्रपटात अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्यावर चित्रीत झालं होतं. नोराने गाण्याच्या रिक्रिएशनमध्ये नृत्याविष्कार दाखवला आहे. हे गाण मध्य पूर्व आणि आफ्रिकी बँड, फनायर यांच्या सहकार्याने बनवण्यात आले आहे. तसेच दिलबर गाण्याला अरेबिक पद्धतीत बनवले जात आहे. या नवीन गाण्यासोबतच नोरा एक पॉपस्टारच्या रुपातही प्रेक्षकांच्यासमोर येत आहे.

- Advertisement -

सलमानच्या भारतमध्येही प्रमुख भूमिका 

नोरा फतेही तिच्या आगामी चित्रपटामुळेदेखील चर्चेत राहिली आहे. नोरा ही सलमान खान निर्मित आणि अभिनीत ‘भारत’ चित्रपटात प्रेक्षकांना दिसणार आहे. या चित्रपटात ती अॅटलांटिक अमेरिकन तरुणीची भूमिका साकारत आहे. ही भूमिका साकारण्यासाठी ती स्पॅनिश भाषादेखील शिकत आहे. हा चित्रपट २०१९ ला प्रदर्शीत होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -