घरमनोरंजनरानू मंडल पुर्वी 'ही' होती स्टेशनवर गाणारी पहिली प्लेबॅक सिंगर

रानू मंडल पुर्वी ‘ही’ होती स्टेशनवर गाणारी पहिली प्लेबॅक सिंगर

Subscribe

आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी ही पहिली प्लेबॅक सिंगर मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर गायची गाणी.

गेल्या काही दिवसांपासून संगीतकार आणि गायक हिमेश रेशमिया याने रेल्वे स्टेशनवर गाणाऱ्या महिलेला बॉलिवूड चित्रपटामध्ये गाण्याची संधी दिल्यानंतर रानू मंडल आणि हिमेश रेशमिया चांगलेच चर्चेत आले आहे. मात्र, अशी संधी देणारे ते पहिले सेलिब्रिटी नाही. यापुर्वी बॉलिवूड निर्माता- दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी देखील अशा एका स्टेशनवर गाणाऱ्या महिलेला बॉलिवूडमध्ये संधी दिली होती.

‘दिल छीछलेदर’ हे गाणं गाण्याआधीच ट्रेनमध्ये गाण गायची दुर्गा

अनुराग कश्यप दिग्दर्शित चित्रपट ‘गँग्स ऑफ वासेपुर’ची सगळीकडेच त्यावेळी चर्चा झाली होती. विशेषतः या चित्रपटातील ‘दिल छीछलेदर’ हे गाणं सुपरहिट झाले होते. उत्तर भारतीय स्टाईलमध्ये हे गाणं मुंबईच्या सायन स्टेशनवर गाणाऱ्या १६ वर्ष असणाऱ्या दुर्गा नावाच्या मुलीने गायलं होतं. आंध्रप्रदेशमध्ये राहत असलेल्या दुर्गाला २ लहान बहिणी आहेत. आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी दुर्गा मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर गाणी गायची.

- Advertisement -

हेही वाचा- रानू मंडलने गायलं तिसरं गाणं; अनोखा अंदाज बघून व्हाल थक्क!

दुर्गाची कला निर्माता आनंद सुरपूरांनी ओळखल्यानंतर दुर्गाला मिळाली संधी

रानू मंडल जशी राणाघाट रेल्वे स्टेशनवर गाताना एतींद्र चक्रवर्तीला दिसल्यानंतर त्याने तिचा व्हिडीओ बनवला. तसाच रेल्वे स्टेशनवर गाणाऱ्या दुर्गाची कला निर्माता आनंद सुरपूर यांनी ओळखली होती. त्यांच्यासोबत दुर्गाने दोन वर्षं काम केले होते. यासोबत त्यांनी दुर्गाचा एक अल्बम सुद्धा रिलिज केला. त्यावेळी संगीत दिग्दर्शक स्नेहा खानवालकर दुर्गाच्या आवाजाने प्रभावित झाल्यानंतर त्यांनी दुर्गा बद्दल अनुरागला सांगितले. त्यानंतर गँग्स ऑफ वासेपूर चित्रपटातील गाणं दिल छीछालेदर हे गाणं दुर्गा गाणार ठरलं.

- Advertisement -

बॉलिवूड हंगामा या मनोरंजन युट्युब चॅनलने दुर्गासोबत एक मुलाखत घेतली होती. त्यात दुर्गाच्या गाण्याची आणि तिच्या आवाजाची झलक दाखवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -