घरमनोरंजनरणवीर नाही 'हा' अभिनेता दिसणार होता कपिल देवच्या भुमिकेत

रणवीर नाही ‘हा’ अभिनेता दिसणार होता कपिल देवच्या भुमिकेत

Subscribe

अभिनेता रणवीर सिंग सध्या आपल्या आगामी ८३ चित्रपटासाठी विशेष मेहनत घेताना दिसत आहे. १९८३ साली भारताने वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळी कपिल देव भारताचा कॅप्टन होता. ८३ हा चित्रपट १९८३ साली भारताने जिंकलेल्या वर्ल्ड कपवर आधारीत आहे. यात रणवीर सिंग कपिल देवच्या भुमिकेत दिसणार आहे. पण ८३ मध्ये कपिलच्या भुमिकेसाठी रणवीर नाही तर दुसरा अभिनेता दिसणार होता.

- Advertisement -

रणवीर सध्या ८३ चित्रपटासाठी कसून सराव करत आहे. रणवीर सध्या हा सराव क्रिकेटपटू कपिल देवच्या मार्गदर्शनाखाली करत आहे. क्रिकेटमधले बारकावे रणवीर कपिल देव यांच्याकडून शिकत आहे. त्यामुळे रणवीर सिंग उत्तम कपिल देव साकारू शकेल. पण कपिल देवच्या भुमिकेसाठी रणवीर सिंग नाही तर रणदीप हुड्डा दिसणार होता. रणदीप हुड्डाची या भुमिकेसाठी लुक टेस्टही घेण्यात आली होती. रणदीप हुड्डा या चित्रपटात दिसणार अशी घोषणाही करण्यात आली होती.

 

View this post on Instagram

 

The incredible untold story of India’s greatest victory! ?? 10th April 2020- Good Friday #Relive83 @83thefilm @kabirkhankk

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

 

View this post on Instagram

 

Workin’ the #NatrajShot ?with the Man Himself #KapilDev ? @83thefilm #blessed #journeybegins @kabirkhankk

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

- Advertisement -

या आधी या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय सिंह करणार होते. पण काही कारणाने संजय सिंह यांच्या हातून हा चित्रपट गेला. आता कबीर खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट रणवीर सिंग करणार आहे. या आधी ज्या ज्या क्रिकेटर्स वर बायोपिक आले आहेत. त्या सगळ्या बायोपिकनी बॉक्स ऑफिसवर भरगोस गल्ला कमवला. सध्या रणवीरचे आलेले सगळे चित्रपट हीट ठरले आहेत. आता रणवीरच्या या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -