नुसरत बरूचाला रणबीरला बघायच टॉवेलवर,आलियाने दिली ‘ही’ रिअॅक्शन!

Mumbai

आयफा २०१९ नुकताच पार पडला आहे. २० ऑक्टोबरला टेलिकास्ट होणार आहे. मात्र आयफाचा एक प्रोमो व्हीडीओ सोशलमिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हीडीओत आयुषमान खुराना सेलेब्रेटीबरोबर एक गेम खेळताना दिसत आहे. पहिल्यांदा तो विकी कौशलला विचारतो जर बिग बॉसमध्ये एका सेलेब्रेटी बघायचे असेल तर तो कोण असेल? यावर विकी रणवीर सिंगचे नाव घेतो आणि म्हणतो मला बघायचं आहे की रणवरीला घरातले कसे थांबवतात. विकीचे हे उत्तर ऐकून दीपिका आणि रणवीर मात्र जोरात हसतात.

विकीच्या या उत्तरानंतर आयुषमान नुसरत भरूचाजवळ जातो. आणि तीला विचारतो तुला कोणाला केवळ टॉवेलवर बघायचं आहे? यावेळी नुसरत थोडीशी लाजते आणि म्हणते, मला रणबीर कपूरला टॉवेलवर बघायचे आहे आणि ती आलियाकडे बघते. यावेळी आलिया हसत असते. यावेळी नुसरत आलीयाची माफी मागते.