घरमनोरंजनVideo: 'द स्काय इज पिंक'चा ट्रेलर रिलीज

Video: ‘द स्काय इज पिंक’चा ट्रेलर रिलीज

Subscribe

'द स्काय इज पिंक' हा चित्रपट मोटिव्हेशनल स्पीकर आयशा चौधरी यांच्या जीवनावर आधारित

अभिनेत्री प्रियांका चोप्रा, अभिनेता फरहान अख्तर, जायरा वसीम असे स्टारर चित्रपट ‘द स्काय इज पिंक’चा आज ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये खूपच उत्सुकता पाहायला मिळत असताना अखेर त्याचा आज ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर, झायरा वसीम, रोहित शरफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रियांका चोप्राचा कमबॅक चित्रपट म्हणून चर्चा होत असलेला ‘द स्काय इज पिंक’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आई-वडिलांच्या लव्ह-स्टोरीत स्वतःला खलनायक समजणाऱ्या मुलीची कथा बघायला मिळते.

- Advertisement -

या ट्रेलरमध्ये प्रियांका-फरहानची लव स्टोरी दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचे स्क्रिनिंग टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात केले जाणार आहे.

- Advertisement -

चित्रपटाची संपुर्ण कथा ही प्रियांका आणि फरहानसह झायरा वसीमच्या भोवती असून झायरा ही फरहान-प्रियांकाच्या मुलीची भूमिका साकारत आहे. आई- वडिलांच्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक वाईट घटनेकरिता ती स्वतःला जबाबदार धरत असते. यावेळा झायराला एक गंभीर आजार जडतो. ती पुर्णतः बरी व्हावी म्हणून दोघेही प्रयत्न करत असतात हाच त्यांचा संघर्ष या चित्रपटामध्ये दाखवण्यात आला आहे.

‘द स्काय इज पिंक’ हा चित्रपट मोटिव्हेशनल स्पीकर आयशा चौधरी यांच्या जीवनावर आधारित आहे. आयशा चौधरी यांना पल्मनरी फायबरोसिस या आजारान ग्रासले होते. हा चित्रपट प्रियांकाचा कमबॅक म्हणून पाहिले जाते. तर झायरा वसीमचा हा शेवटचा चित्रपट असल्याच्या देखील चर्चा सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -