घरमनोरंजन११ वर्षानंतर ऑस्करमध्ये सुपहहिरो ब्लॅक पँथर हिट

११ वर्षानंतर ऑस्करमध्ये सुपहहिरो ब्लॅक पँथर हिट

Subscribe

माव्हर्ल स्टुडिओसाठी ऑस्कर जिंकणारा ब्लॅक पँथर हा पहिलाच अफ्रिकन सुपरहिरो ठरला आहे. रोमा आणि बोहेमियन ऱ्हाप्सडी या चित्रपटानंतर सर्वाधिक नामांकन ही ब्लॅक पँथर ला मिळाली आहेत. ब्लॅक पँथरने तीन पुरस्कारांवर मोहोर उमटवत मार्व्हलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

तब्बल ११ वर्षानंतर ऑस्करला सुपरहिरोंनी मजल मारली आहे. सुपरहिरोंच्या पंकतीत नव्याने सामील झालेल्या ब्लॅक पँथर या चित्रपटाने ऑस्करमध्ये बाजी मारली आहे. माव्हर्ल स्टुडिओसाठी ऑस्कर जिंकणारा ब्लॅक पँथर हा पहिलाच अफ्रिकन सुपरहिरो ठरला आहे. रोमा आणि बोहेमियन ऱ्हाप्सडी या चित्रपटानंतर सर्वाधिक नामांकन ही ब्लॅक पँथर ला मिळाली आहेत. ब्लॅक पँथरने तीन पुरस्कारांवर मोहोर उमटवत मार्व्हलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

ब्लॅक पँथरला एकूण सात नामांकन मिळाली होती. त्यातील तीन पुरस्कारांवर ब्लॅक पँथरने आपलं नाव कोरलं आहे. सर्वोत्कृष्ट वेशभूषा, सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन, ओरिजनल स्कोअर या तिन्ही प्रकारात ब्लॅक पँथर ऑस्कर पटकवले. ब्लॅक पँथर हा पहिला अफ्रिकन सुपरहिरो आहे. या चित्रपटाचं सगळ्याच स्तरातून कौतूक होत होतं. जगभरातील समिक्षकांनी या चित्रपटाला गौरवलं होतं.

- Advertisement -

मार्व्हलच्या डेडपूल, व्हिजन,नोव्हा,स्पीड,लुना यांबरोबर सपरहिरोच्या दुसऱ्या फळीत नव्याने भरती झालेल्या ब्लॅक पँथर हा एक सुपरहिरो या चित्रपटाने सगळ्यांचेच लक्ष वेधलं. तब्बल ११ वर्षांनंतर एका सुपरहिरोने ऑस्करमध्ये बाजी मारली आहे. १६ फेब्रुवारी २०१८ ला ब्लॅक पँथर भारतात प्रदर्शित झाला. या चित्रपटानं पहिल्याच आठवड्यात १३०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची कमाई केली होती. भारतच केवळ या चित्रपटानं ३० कोटींचा गल्ला जमवला होता.

- Advertisement -

९१ व्या ऑस्कर पुरस्कार कॅलिफोर्नियाच्या डॉल्बी थिएटरमध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला यंदा कोणीच होस्ट करत नाहीये. कॉमेडियन केविन हार्ट या पुरस्कार सोहळ्याला होस्ट करणार होते. मात्र पुरस्कार सोहळ्याच्या काही दिवस आधीच त्यांनी होस्ट करण्यास नकार दिला. त्यांच्या समलैंगिकतेच्याविरोधात आलेल्या ट्विट्सवरुन झालेल्या वादानंतर त्यांनी होस्ट करण्यास नकार दिला आहे. ऑस्कर पुरस्काराला होस्ट न करणे हे ऑस्करच्या इतिहासात ३ वर्षानंतर झाले आहे. या पुरस्कार सोहळ्यामध्ये हॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -