Video : ऑस्करची ट्रॉफी त्यांने खूर्ची खाली लपवली, व्हीडिओ व्हायरल !

Mumbai

सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ऑस्कर सोहळा अखेर पार पडला. यंदाच्या ऑस्करवर ‘पॅरासाइट’ या चित्रपटाने छाप पाडली. ऑस्करच्या अंतीम फेरीपर्यंत पोहोचणारा हा पहिलाच दक्षिण कोरियन चित्रपट आहे. याव्यतिरीक्त अभिनेता जोकिन फिनिक्सने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले. या पुरस्कार सोहळ्यातील गमतीशीर व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडीओत ऑस्कर पुरस्कार पटकावल्यानंतर लेखक तायका वायतिती आपल्या पुरस्काराची ट्रॉफी खुर्ची खाली लपवताना दिसत आहे.

एका अभिनेत्रीने तायकाचा हा व्हीडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हीडीओवर नेटकऱ्यांनी खूप कमेंट केल्या आहेत. काहींनी हा व्हीडीओ मजेत घेतला आहे तर काहींनी हे असं करणं चुकीचं आहे अशा कमेंट दिल्या आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ट्रॉफी ठेवण्यासाठी खुर्च्यांवर जागा नसल्याने त्याने ती खाली ठेवली असावी असं एका युजरने लिहिलं.

एकीकडे मंचावर ऑस्कर पुरस्काराचे वितरण होत असताना दुसरीकडे आपल्या जागेवर बसलेला तायका त्याला मिळालेली ट्रॉफी त्याच्या समोरील खुर्चीच्या खाली असलेल्या जागेत लपवताना दिसत आहे. ब्री लार्सन या अभिनेत्रीने तिच्या ट्विटर अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट केला आहे.

तायका वायतितीला ‘जोजो रॅबिट’ या चित्रपटासाठी रुपांतरित पटकथेचा पुरस्कार मिळाला. तायका हा न्यूझीलंडमधील माओरी वंशाचा लेखक आहे. ऑस्कर पुरस्कार स्वीकारताना त्याने उजव्या कट्टरवादावर मार्मिक टिप्पणी केली.