घरमनोरंजनपुलंचे ‘अनंत उपकार’

पुलंचे ‘अनंत उपकार’

Subscribe

अनंत अंकुर या दिग्दर्शकाने पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचे निमित्त घेऊन ‘सदू आणि दादू’ हा पुल लिखित दीर्घांक कला अकादमीच्या महोत्सवात सादर केला. नीटनेटके दिग्दर्शन, कलाकारांचा प्रभावी अभिनय, मनोरंजनाची हमी अस सार काही पाहिल्यानंतर तीन तास मनोरंजन होऊ शकेल असे आणखीन काही देता येईल का अशी विचारणा झाली आणि त्यातून ‘मोठे मासे, छोटे मासे’ या आणखीन एका दीर्घांकाची निर्मिती करण्याचे ठरले. एकाच कलाकारांच्या संचात हिंदी, इंग्रजी, मराठी असे प्रयोग झालेले आहेत. यात आता एकाच लेखकाची दोन नाटके, एकाच कलाकारांच्या संचात सादर करणे या अभिनव प्रयोगाची भर यात पडणार आहे.

अनेक एकांकिकांचे नाटकात रूपांतर झालेले आहे. परंतु, पुलंच्या दीर्घांकाचे नाटकात रूपांतर करणे कठीण आहे. ‘सदू आणि दादू’ या दीर्घांकात कार्यालयातील कामाजाचे नाट्यरूप सादर केलेले आहे. मोठे मासे छोटे मासे या पुलंच्याच दीर्घांकात बसस्टॉपवरील घटनांचा मागोवा घेतलेला आहे. अनंतने या दोन्ही दीर्घांकांना एकत्र आणून तीन तास छान मनोरंजन करू शकेल अशा नाटकाची निर्मिती केलेली आहे. ‘नाटकचा दिग्दर्शक मी जरी असलो तरी पुलंचे लिखाण हे भरपूर मनोरंजन करणारे आहे, त्यामुळे दिग्दर्शकाला फारसे कसब दाखवावे लागत नाही. पुलंचे ‘अनंत उपकार’ हे या निमित्ताने मला म्हणावेसे वाटते’.

- Advertisement -

अनंत अंकुर याची ‘जाणता राजा’ या महानाटकातून बालशिवाजीच्या भूमिकेपासून सुरूवार झाली. फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हीजन इथे त्याने अभिनयाचे प्रशिक्षण घेतलेले आहे. या बळावर त्याला सत्यदेव दुबे, विजया मेहता यांच्या कार्यशाळेत दिग्दर्शनाचे मार्गदर्शन घेता आले. नाट्यपरिषदेच्यावतीने जी दीर्घांक स्पर्धा घेतली गेली त्यात त्याने प्रथम क्रमांकाचा एक लाखाचा पुरस्कार पटकावला होता. त्याच्या या नाट्यचळवळीमध्ये ओमकार दामले, गायत्री मोहोळ, सुशील वळंजू, राजू मोरे, किरण बिळलकर, विश्वजीत वळंजू या कलाकारांचा समावेश आहे. प्रा. प्रदीप सरवदे लिखित नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर आधारित ‘मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे’ या नाटकाचे दिग्दर्शन अनंत अंकुर करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -