घरमनोरंजन'पॅडेड की पुशअप' वेबसिरीज तरूणांमध्ये हिट

‘पॅडेड की पुशअप’ वेबसिरीज तरूणांमध्ये हिट

Subscribe

हंगामा प्ले आणि कॅफेमराठी यांनी एकत्र येऊन 'पॅडेड पुशप' ही मराठी वेब-सिरीज हंगामा प्लेवर रिलीज केली आहे आणि रिलीजच्या काही काळातच या वेब-सिरीजने लाखोंच्यावर लाईक्स मिळावले आहेत. 

आज सगळ्यांकडेच स्मार्ट फोन आणि मनसोक्त इंटरनेट असल्याकारणाने डिजिटल मनोरंजन विश्वाला वेगळीच झळाळी आली आहे. हवं तेव्हाहवं ते पाहता येतं ही मुभा असल्याने तरुण वर्गसध्या वेबसिरीजला जास्त पसंती देत आहे. या डिजिटल विश्वात हंगामा कंपनी सध्या वेबसिरीजमध्ये अग्रगण्य आहे. हंगामा प्ले आणि कॅफेमराठी यांनी एकत्र येऊन पॅडेड पुशप‘ ही मराठी वेब-सिरीज हंगामा प्लेवर रिलीज केली आहे आणि रिलीजच्या काही काळातच या वेब-सिरीजने लाखोंच्यावर लाईक्स मिळावले आहेत. 

 

- Advertisement -

या वेबसिरिज मध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील अनिकेत विश्वासरावतेजश्री प्रधानसक्षम कुलकर्णी आणि किशोरी अंबिये यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रासंगिक विनोदाच्या चौफेर फटकेबाजीमुळे ही वेब-सिरीज प्रदर्शनातच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या सिरीजचा कंटेंट इतका प्रभावी आहे की,त्याला भाषेची मर्यादा नाहीम्हणूनच मराठी सोबत इतर भाषिक प्रेक्षक देखील ही सिरीज बघत आहेतमराठी कुटुंबातकिंवा घरात ज्या गोष्टींवर बोलले जात नाहीकिंवा जो विषय टाळला जातो तोच विषय यात हाताळला असल्याने देखील सिरीज बघण्याची उत्सुकता वाटत असते. 

- Advertisement -

या वेब सिरीजची कथा नवीन लग्न झालेल्या आदीत्य (अनिकेत विश्वासराव)च्या जीवनाभोवती फिरते. अंर्तवस्र विकण्याचे काम करत असलेला आदित्य आपल्या कामाचे स्वरुप स्वत:ची पत्नी आणि खोचक सासू पासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. यात कशी विनोदनिर्मिती होते ते बघण्यासारखे आहे. अशी भन्नाट आणि आगळावेगळा विषय असणारी वेबसिरिज प्रत्येकाने एकदा तरी नक्कीच पाहावी अशीच आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -