घरमनोरंजनपद्मिनी कोल्हापुरेचा प्रवास

पद्मिनी कोल्हापुरेचा प्रवास

Subscribe

परदेशात मराठी चित्रपटाचे चित्रीकरण होणे हा विषय आता तसा नवीन राहिलेला नाही, पण या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका कोण साकार करतो आहे याची उत्सुकता मात्र प्रेक्षकांमध्ये असते. शशांक उदापूरकर या अभिनेत्याने आपल्या दिग्दर्शनात प्रवास नावाचा चित्रपट करायला घेतलेला आहे. त्यात अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे ही जोडी प्रथमच मराठी चित्रपटामध्ये झळकणार आहे. सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटापासून पद्मिनीचा प्रवास खर्‍या अर्थाने सुरू झाला, तो अगदी हिंदीत नायिका म्हणून स्थिर होण्यापर्यंत पोहोचला होता. जवळजवळ सर्वच बड्या स्टार्सबरोबर नायिका होण्याचा मान तिला मोठ्या पडद्यावर प्राप्त झालेला आहे. ‘मुंबई आमची’, ‘चिमणी पाखरं’ या चित्रपटांच्या निमित्ताने मराठी रुपेरी पडद्यावर ती दिसलेली आहे. प्रवासाच्या निमित्ताने ती पुन्हा मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण हे अमेरिकेत झालेले आहे. शशांकबरोबर विक्रम गोखले, रजत कपूर यांचासुद्धा कलाकार म्हणून या चित्रपटात सहभाग आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -