घरमनोरंजन'पळशीची पीटी' नावाबद्दल उत्सुकता कायम..

‘पळशीची पीटी’ नावाबद्दल उत्सुकता कायम..

Subscribe

पळशीची पीटी या चित्रपाटचे नुकतेच पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. चित्रपटाच्या नावावरून प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

शिक्षक दिनाच्या मुहूर्तावर पळशीची पीटी या अगामी मराठी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. गेले अनेक दिवस या चित्रपटाची चर्चा होती. एका साताऱ्या सारख्या गावातून येणाऱ्या दिग्दर्शकाने हा चित्रपट साता समुद्रापार नेला होता.

या पुरस्काराने गौरव

- Advertisement -

प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावले आहेत. अनेक चित्रपट महोत्सवामधून ‘पळशीची पीटी’ या चित्रपटाला गौरवण्यात आलं होतं. चित्रपटाने . संस्कृती कलादर्पण पुरस्कार, महाराष्ट्र शासन विशेष पुरस्कार यांसारखे पुरस्कार आपल्या नावावर केले. तर कान्स फिल्म फेस्टिव्हल, गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट गौरवला गेला.

चित्रपटाच्या नावामुळे उत्सुकता

- Advertisement -

‘पळशीची पीटी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन धोंडिबा कारंडे यांनी केलं आहे. ‘पळशीची पीटी’ या नावामुळे मात्र प्रेक्षकांच्या मनात नेमका हा चित्रपट कशावर अधारीत आहे याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. नावावरून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. हा चित्रपट भारताची धावपटू पी.टी उषा हीच्या जिवनावर आधारीत असल्याचेही म्हटल जातय.

येत्या ऑक्टोबर महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र नेमक्या कोणत्या तारखेला ? यात कोण कोण कलाकार असणार ?नेमकी या चित्रपटाची कथा काय आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -