घरट्रेंडिंग#PanipatTrailer: 'पानिपत'च्या महायुद्धाचा थरार रुपेरी पडद्यावर

#PanipatTrailer: ‘पानिपत’च्या महायुद्धाचा थरार रुपेरी पडद्यावर

Subscribe

सत्य घटनेवर आधारित ‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. सगळेच पराभव विसरण्यासारखे नसतात. मराठा साम्राज्य अबादीत ठेवण्यासाठी करण्यात आलेले महायुद्ध पानिपतच्या रणभूमीत पार पडले. त्या ऐतिहासिक घटनेला रुपेरी पडद्यावर साकारणारे दिग्दर्शक-निर्माता आशुतोष गोवारीकर यांचा हा महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. अभिनेता संजय दत्त, अर्जुन कपूर आणि अभिनेत्री क्रीती सिनॉन यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. कालच त्याचे व्यक्तिरेखेतील पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले होते. तर आज चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. येत्या ६ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Panipat
पानिपत

चित्रपटात मोहनिस बेहेल, पद्मिनी कोल्हापुरे आणि झीनत अमान यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. १४ जानेवारी १७६१ या दिवशी लढल्या गेलेल्या पानिपतच्या युद्धावरचा हा चित्रपट बेतलेला आहे. जवळपास तीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये अभिनेता संजय दत्तची दमदार एण्ट्री दाखवली आहे. चित्रपटात संजय दत्त अहमद शाह अब्दाली तर अर्जुन कपूर सदाशिवरावांच्या भूमिकेत आहे. अभिनेत्री क्रिती सिनॉन पार्वतीबाईंची भूमिका साकारत आहे. लगान, जोधा-अकबर, मोहेंजोदारोनंतर आता आशुतोष गोवारीकर पानिपत घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -